लग्न म्हटलं की अपेक्षा, आवडीनिवडी ओघाने आल्याचं. लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील सर्वात मोठी आणि खास गोष्ट असते. लग्न जुळवण काही सोपं काम नव्हे हे अनेकांना माहितच असेल. पण सध्याच्या काळात मॅट्रिमोनियल साईट्स आल्यामुळे ज्यांना लग्न करायचे आहे असे वधू - वर स्वतःच या साईट्सवर नाव नोंदणी करतात आणि आपल्याला हवा तसा परफेक्ट मॅच शोधतात, हे तुलनेने अधिक सोपं आहे. परंतु जेव्हा मॅट्रिमोनियल साईट्स अस्तित्वात नव्हत्या तेव्हा पेपरमध्ये लग्नासाठी उतावळ्या वधू - वरांचे नाव आणि अपेक्षेसहित छोट्या छोट्या रकान्यांमध्ये जाहिराती यायच्या. अशा जाहिराती आजही येतात परंतु सध्याच्या डिजिटल युगामुळे सगळ्यांनाच मॅट्रिमोनियल साईट्स वापरणे अधिक कम्फर्टेबल वाटते( Woman seeks ‘handsome’ businessman groom with 20-acre farmhouse: ‘No farters or burpers’).
लग्न ठरवण्यापूर्वी वधू - वर एकत्रित भेटून आपल्या होणाऱ्या जोडीदाराकडून नेमक्या काय काय अपेक्षा आहेत याबद्दल अधिक सविस्तर बोलतात. या बोलण्यातून जर एकमेकांचे विचार आणि आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा तंतोतंत जुळल्या तरच पुढचे 'शुभमंगल सावधान' होते. लग्नासाठीच्या या आगळ्यावेगळ्या इच्छा, अपेक्षांमुळेच काहींचे लग्न जमत नाही, याच कारणाने आजही कित्येकजण अगदी परफेक्ट मॅच मिळाल्याशिवाय बिनलग्नाचे राहायला तयार असतात. अशातच नेमकी वृत्तपत्रांत 'वर पाहिजे' म्हणून छापलेली जाहिरात नुकतीच नेटकरी आणि सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये एका तीस वर्षीय वधूने आपला होणारा नवरा कसा असावा याबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. तिच्या या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा वाचून अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे तर, तिने वृत्तपत्रांत दिलेली जाहिरात व्हयरल होत आहे, असं नेमकं काय आहे या जाहिरातीत ते पाहूयात(Woman seeks ‘handsome’ businessman with 20-acre farm: ‘No farters or burpers’).
वर पाहिजे पण...
सध्या सोशल मिडीयावर कमी वेळात प्रचंड प्रमाणांत व्हायरल झालेली ही जाहिरात कोणत्या वृत्तपत्रांतील आहे ते अद्याप समजले नाही. परंतु या महिलेच्या आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा वाचून थक्क व्हायला होत. स्वतः ३० वर्षीय असून देखील या महिलेला २५ ते २८ वय असलेला वयाने तरुण असलेला वर हवाय. इतकेच नाही तर आपल्या जोडीदाराकडे ऐश्वर्यसंपत्ती असावी, अशी देखील अट घातली गेली आहे. याशिवाय, बंगला, मोठा बिझनेस, किमान २० एकरभर फार्महाऊस आणि स्वयंपाक करता यावा अशा चकित करणाऱ्या अपेक्षा लिहिल्या आहेत.
या पोस्टला सोशल मिडीयावर ११० हून अधिक व्ह्यूज, आणि ३००० हून अधिक लाईक्स, ८०० हून अधिक रीशेअर मिळाले आहेत. यासोबतच प्रतिक्रियांचा वर्षाव झाला असून ती पोस्ट तितकीच व्हायरल देखील झाली आहे. जाहिरात देणारी महिला इतक्यावरच थांबली नाही तर तिने तिची एक आगळीवेगळी अपेक्षा देखील अगदी उघड सांगितली आहे. तिला असा जोडीदार हवा आहे तो पादणे किंवा ढेकर देणे अशा नैसर्गिक क्रिया देखील करणार नाही.
गोडगोजिऱ्या बाळांना पाहून त्यांचा चावा घ्यावा असं वाटणारा विचित्र प्रकार, सामान्य वाटणारी माणसंही...
30-year-old feminist woman, working against capitalism requires a 25-year-old wealthy boy with a well-established business.
— Rishi Bagree (@rishibagree) November 24, 2024
Koi Ho tou batana 😀 pic.twitter.com/7YVPnmMMfT
Rishi Bagree नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून वृत्तपत्रांतील लग्नाच्या जाहिरातीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अनेक नेटकऱ्यांना ही पोस्ट हास्यास्पद वाटली आणि त्या महिलेच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील केल्या आहेत. या कमेंट्सपैकी एकाने लिहिले आहे की हा विनोद आहे का ? तर दुसरीकडे झेपटो सारख्या अगदी १० मिनिटांत हवी ती वस्तू घरपोच डिलिव्हरी करणाऱ्यांनी तिला तसाच १० मिनिटांत वर शोधून दिला पाहिजे अशी खिल्ली उडवली आहे. आता पुरुष शांतते पादु देखील शकत नाहीत, अशा प्रकारे नेटकऱ्यांनी तिच्या जोडीदाराच्या अपेक्षा वाचून तिची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे.