Lokmat Sakhi >Social Viral > बोंबला! भावाला एक्स गर्लफ्रेंडनं गिफ्ट म्हणून कचऱ्याच्या पिशव्या दिल्या; फोटो पाहून लोक म्हणाले...

बोंबला! भावाला एक्स गर्लफ्रेंडनं गिफ्ट म्हणून कचऱ्याच्या पिशव्या दिल्या; फोटो पाहून लोक म्हणाले...

Woman sends garbage bags to ex-boyfriend : बँडेजसुद्धा पाठवले असते. पण हृदयाला झालेल्या मोठ्या जखमेला हे बॅण्डेज छोटे पडले असते. अशी प्रतिक्रिया स्विगीनं दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:35 AM2023-07-21T11:35:57+5:302023-07-21T13:01:42+5:30

Woman sends garbage bags to ex-boyfriend : बँडेजसुद्धा पाठवले असते. पण हृदयाला झालेल्या मोठ्या जखमेला हे बॅण्डेज छोटे पडले असते. अशी प्रतिक्रिया स्विगीनं दिली आहे.

Woman sends garbage bags to ex-boyfriend via Swiggy Instamart | बोंबला! भावाला एक्स गर्लफ्रेंडनं गिफ्ट म्हणून कचऱ्याच्या पिशव्या दिल्या; फोटो पाहून लोक म्हणाले...

बोंबला! भावाला एक्स गर्लफ्रेंडनं गिफ्ट म्हणून कचऱ्याच्या पिशव्या दिल्या; फोटो पाहून लोक म्हणाले...

ब्रेकअपनंतर आपल्या एक्स पार्टनरबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड राग असतो. रागाच्या भरात लोक काहीही करतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. आपण सर्वजण आपल्या आयुष्यात कधी ना कधी या स्थितीचा सामना करतो. ट्विटवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे. (Woman deliver  garbage bags to ex via Swiggy Instamart leaves internet in splits)

राग व्यक्त करण्याची प्रत्येकाची  पद्धत वेगळी असते. कोणी ओरडून, कोणी रडून तर कोणी सूड उगवून आपला राग दाखवतं. पण एक्स बॉयफ्रेंडचा राग मनात ठेवून तरूणीनं अशी काही भेटवस्तू दिली आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. (Woman sends garbage bags to ex-boyfriend via Swiggy ) आपल्या आधीच्या पार्टनरला कचरा समजून या तरूणीने कचऱ्याची पिशवी भेट म्हणून दिली आहे. (Swiggy Replies To Man Who Got Garbage Bags As Gift From Ex; Says Bade Zakham Ke Liye…)

नक्कीच हा त्या व्यक्तीच्या आय़ुष्यातील असा क्षण असेल जो तो कधीच विसरू शकणार नाही. या व्यक्तीच्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव दिया आहे. तिनं त्याला गारबेज बॅग पाठवल्याचा मेसेज केल्याचं दिसून येतंय. या मेसेजचा स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे. दियाने या मेसेजमध्ये म्हटले की, तू या पिशव्या वापरू शकतो. तर या पिशव्या लहान असतील तर नवीन पिशव्यासुद्धा पाठवेन. 
आपल्या एक्स बॉयफ्रेंडला कचरा समजल्याबद्दल लोकांमध्ये हशा पिकला आहे.

 स्विगीची प्रतिक्रिया....

स्विगीनं या पोस्टवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  बँडेजसुद्धा पाठवले असते. पण हृदयाला झालेल्या मोठ्या जखमेला हे बॅण्डेज छोटे पडले असते. अशी प्रतिक्रिया स्विगीनं दिली आहे.  नेहमीप्रमाणे या पोस्टवरही विनोदी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेटिझन्सनी हा फोटो पाहून तिच्यासोबतही भविष्यात असंच घडेल असं म्हटलं आहे.

Web Title: Woman sends garbage bags to ex-boyfriend via Swiggy Instamart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.