आपण काय करतो, आपलं जॉब प्रोफाइल काय हे अनेकजण मानानं मिरवतात. व्यावसायिक सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपडेटही केले जाते. मात्र एका महिलेने तिच्या लिंक्डइन (LinkedIn) प्रोफाइलवर जॉब म्हणून सेक्स वर्क असे नमूद केले. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. एरियल इगोझी नावाच्या महिलेने तिच्या इतर कामाच्या सहभागासह सेक्स वर्कदेखील यादीत जोडले. तिने यावर एक लांबलचक पोस्ट देखील लिहिली आणि ती साहजिकच ऑनलाइन व्हायरल झाली आणि इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली. (Woman adds sex work as experience on her LinkedIn profile. Viral post divides Internet)
क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करणार्या एरियल इगोजीने तिच्या प्रोफाइलवर तिच्या कामाच्या अनुभवामध्ये सेक्स वर्क जोडले. आणि पोस्टमध्ये म्हटले , “मी दोन आठवड्यांपूर्वी इन-हाउस जॉब सोडला. आता मी आनंदी आहे की नाही हे मी स्वतःला विचारू शकेन." (Women adds 'sex work' on her public LinkedIn profile, post goes viral; Internet divided)
एरियलच्या पोस्टला आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, ही पोस्ट आता ऑनलाइन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी तिच्या बोल्डनेसचे कौतुक केले, तर काहींना ते फारसे आवडले नाही.
एका वापरकर्त्याने लिहिले, 'आता देहविक्रयाची जाहिरात करू शकतो? म्हणजे, आम्ही कितीही नाही म्हणत असलो तरीही, लैंगिक संबंधासाठी आर्थिक मोबदला मिळणे हा व्यवसाय आहे. हे असे असले तरीही ते बेकायदेशीर आहे.'