तुम्हाला कोणी फोटो पाठवला आणि विचारलं की माझी उंची ओळखून दाखव तर? त्यातही ते आव्हान एखाद्या मुलीने दिले तर? काय कराल? अंदाज लावाल की दुर्लक्ष कराल? अशाच प्रकारचं चॅलेंज एका तरुणीने ट्विटरवर दिले. ट्विटरवर फोटो पोस्ट करत तिने 'माझी उंची ओळखून दाखवा' असं कॅप्शन दिलं. लागले काही उत्साही वीर कामाला. काहींनी अंदाजपंचे सांगूनही टाकलं.
पण एक सुपीक डोक्याचा, त्याने मात्र गणिताची सूत्रे वापरून त्या मुलीची उंची ओळखण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न सोशल मिडीयावर व्हायरलही झाला. आता हे वाचून कुणाला वाटेल की किती रिकामा वेळ आहे लोकांकडे, पण आहेत खरे काही उत्साही(Woman shares pic, asks Twitter to guess her height. Man tries answering with trigonometry).
ट्रिग्नोमेट्रीची सूत्रे व्हायरल
guess my height! pic.twitter.com/kNkaBn7d2q
— Pallavi Pandey (@pallavipandeyy) February 27, 2023
ट्विटरवर पल्लवी पांडे या तरुणीने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती पायऱ्यांसमोर, काळ्या रंगाचा पोशाख घालून उभी आहे. त्या फोटोसह कॅप्शन लिहित ती म्हणते, 'माझी उंची ओळखून दाखवा''. पल्लवीचे हे चॅलेंज नेटकऱ्यांना आवडले आहे. त्यांनी अनेक तर्क - वितर्क लावून चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, एका तरुणाने तिची उंची मोजण्यासाठी ट्रिग्नोमेट्री या गणिताच्या सूत्राचा वापर केला आहे. त्याने फोटोवर ट्रिग्नोमेट्रीची सूत्रे रेखाटून तिची उंची ओळखण्याचा प्रयत्न केला. त्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ''5' 4.5 उंची असावी असे वाटते." पण नक्की किती असेल हे जाणून घेण्यासाठी, आता मी देखील उत्सुक आहे". त्याचा हा खटाटोप पाहून नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे.
पल्लवीने देखील त्या युजरची पोस्ट शेअर केली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''हॅट्स ऑफ टू यू, तुझे प्रयत्न मला आवडले, पण माझी उंची जास्त आहे. पण वाह!.'' शाळेनंतर गणिताची सूत्रं आयुष्यात काहीच कामाची नाही असं अनेकजण म्हणत असले तरी या भाऊने ते सूत्र वापरुन पाहिलं.
अय्या, ड्रेस रंग बदलतोय! लाईट पडताच ड्रेसचा कलर चेंज, पाहा फॅशन का जलवा..
एका युजरने कमेंट करत 'ट्रिग्नोमेट्री, या युजरला प्रचंड फेमस करेल', अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने लिहिले, 'भाऊ, ऑनलाईन क्लासेसचे टीचर वाटत आहे'. एकूण थोडीशी गंमत दुसरं काही नाही.