Lokmat Sakhi >Social Viral > ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

Woman measures pizza, claims she received smaller size. Twitter reacts : ऑर्डर केलेल्या पिझ्झाची अजब तक्रार दाखल....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 12:29 PM2023-04-13T12:29:41+5:302023-04-13T12:42:37+5:30

Woman measures pizza, claims she received smaller size. Twitter reacts : ऑर्डर केलेल्या पिझ्झाची अजब तक्रार दाखल....

Woman Shares Twitter Rant About Getting 8-Inch Pizza Instead Of 10-Inch, Internet Can Relate | ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

ऑर्डर केलेला पिझ्झा २ इंचांनी छोटा दिला म्हणून तक्रार करणारी 'ती' होतेय व्हायरल...

"वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है"... हा बॉलिवूडच्या "स्त्री" या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांचा फेमस डायलॉग सगळ्यांनाच माहित असेल. खरंतर, हा डायलॉग स्त्रीच्या बाबतीत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने घेता येऊ शकतो. प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रकारची अंगभूत शक्ती असतेच. पण ती त्या शक्तीचा , बुद्धीचा कसा उपयोग करेल हे सांगता येत नाही. सध्या ट्विटरवर अशाच एका स्त्रीच्या अफाट विचारशक्तीचे अद्भुत दर्शन घडविणारा एक फोटो व्हायरल होताना  दिसत आहे. 

आपण बहुतेक वेळा घरच्या जेवणाचा कंटाळा आला की बाहेर जेवायला जातो किंवा घरीच जेवण ऑर्डर करतो. पिझ्झा हा तसा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पिझ्झा म्हणजेच मैद्याच्या कणकेपासून गोलाकार ब्रेड तयार करुन त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस आणि भाज्यांचे टॉपिंग घातले जाते. मग यावर चीज आणि काही हर्ब्स घालून हा पिझ्झा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व केला जातो. परंतु घरी ऑर्डर करुन येणारा पिझ्झा खायच्या आधी तुम्ही कधी तो किती इंचाचा आहे हे मोजून पाहिलं आहे का? असाच काहीसा हा किस्सा आहे. पिझ्झाचा आकार असतो गोल, त्याच्या एका तुकड्याचा आकार असतो त्रिकोणी. गोलाकार, त्रिकोणी असे वेगवेगळे आकार असलेला पिझ्झा येतो चौकोनी बॉक्समध्ये पॅकिंग करुन म्हणून पिझ्झाचा आकार नेमका कोणता याबाबत शंका निर्माण होऊ शकते. परंतु तो किती इंचाचा आहे यावरुन देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे(Woman measures pizza, claims she received smaller size. Twitter reacts).  

नेमकं या स्त्रीने काय केलं ? 

Big Paratha या ट्विटरपेजवरुन पिझ्झाचे मोजमाप करतानाचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ही महिला कोण, कुठली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु या महिलेने ट्विटरवर फोटो शेअर करत म्हटले आहे की मी, "१० इंचाचा पिझ्झा ऑर्डर केला होता आणि त्यांनी मला फक्त ८ इंचाचा पिझ्झा पाठवला,” अशी तक्रार तिने केली आहे. बरं ही महिला केवळ तक्रार करुन थांबली नाही तर तिने चक्क पट्टी घेऊन त्या पिझ्झाचे मोजमाप घेतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सरळ सरळ तो पिझ्झा १० इंचाचा नसून फक्त ८ इंचाच आहे, हे स्पष्ट दिसत आहे. 

या पिझ्झाचे मोजमाप करण्यासाठी तिने जी पट्टी वापरली आहे ती खूपच अस्वच्छ आणि गंजलेली पट्टी असल्याचे नेटकऱ्यांनी तिला कमेंट्स मार्फत सांगितले आहे. हे वाचताच तिनेदेखील नेटकऱ्यांना सणसणीत उत्तर देत खडे बोल सुनावले आहेत. तिच्या स्वतःच्या पोस्टला उत्तर देताना, ती म्हणते "मला माहित आहे पट्टी फारच अस्वच्छ आणि गंजलेली आहे. प्रत्येकजण मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी प्रत्यक्षात त्या पिझ्झाला या पट्टीचा स्पर्श होऊ दिला नाही. ती काय एवढी मूर्ख नाही. असे म्हणत तिने नेटकऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिले आहे.

जलेबी तेरा अंग्रेजी नाम क्या है? पाकिस्तानी हॉटेलने इंग्रजीत सांगितलं जिलेबी म्हणजे काय...

  आइस्क्रीम विथ पुदिना चटणी इन पाणीपुरी, हा ' असा ' पदार्थ खायचा का तुम्हाला उन्हाळयात?

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :- 

नुकतीच ट्विटरवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट शेअर केल्यापासून ८८००० व्ह्यूज या पोस्टला मिळाले आहेत व दिवसेंदिवस या पोस्टचे व्ह्यूज वाढतच आहेत. याव्यतिरिक्त, या पोस्टला जवळपास १००० लाईक्स मिळाले आहेत. हा फोटो बघताच ट्विटरवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने, "इतकं कोण चेक करत बसत का ?" असा प्रश्न केला आहे. "ऑडिट करताना देखील मी इतकी चेकिंग नाही करत" अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे. पिझ्झा किती इंचाचा आहे त्यापेक्षा तो चवीला किती छान लागतो हे तपासून पहाण्याचा सल्ला एका नेटकाऱ्याने दिला आहे.

Web Title: Woman Shares Twitter Rant About Getting 8-Inch Pizza Instead Of 10-Inch, Internet Can Relate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.