Viral News : सध्या सगळीकडे AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सची चर्चा जगभरात रंगली आहे. एआय मुळे वेगवेगळी काम करण्यात किती फायदे मिळतील आणि लोकांच्या नोकऱ्या कशा जातील यावरही चर्चा सुरू आहे. सोबतच एआयचे दुष्परिणामही समोर येत आहेत. लवकर पैसे कमावण्याच्या नादात एका तरूणीनं असं काही केलं, ज्याचा तिला आता पश्चाताप होत आहे.
आर्टिफिशिअल इंटॅलिजन्समुळं तुम्हाला कसा फटका बसू शकतो याचं ही घटना उत्तम उदाहरण आहे. सोबतच लवकर पैसे कमावण्याची इच्छा कशी तुमच्यासाठी घातक ठरू शकते हेही यातून दिसून येतं. एका तरूणीनं १,५०० पाउंड म्हणजे साधारण १ लाख ६० हजार रूपयात आपला चेहरा विकला. पैसे चांगले मिळाले म्हणून तिने कशाचाही विचार केला नाही. पण त्यानंतर जेव्हा तिला यामागचं सत्य समजलं तेव्हा तिला धक्का बसला. आता तिला केवळ पश्चाताप होत आहे.
चेहरा विकून उडाली रात्रीची झोप
डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, फसवणूक झालेल्या तरूणीचं नाव लूसी आहे. लूसीनं अनेक सेलिब्रिटींसोबतच आपला चेहरा एका आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स स्टार्ट-अपला विकला. ज्यासाठी तिला कंपनीकडून चांगली रक्कमही मिळाली. पैसे मिळाल्यानं तरूणी आनंदी होती. तरूणीनं कंपनीसोबत एक करार केला होता. पण यातील एक बाब कंपनीनं तिला सांगितली नव्हती. लूसीला काही व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते. ज्यासाठी तिला दोन तासांचा वेळ लागला. त्यानंतर कंपनीनं सांगितलं ते आता तिचा चेहरा कुठेही वापरू शकतात आणि यासाठी त्यांना लूसीची परवानगी घेण्याचीही गरज नाही. इतकंच नाही तर तिला पुन्हा एक पैसाही मिळणार नाही.
आता होताय पश्चाताप
लूसीनं सांगितलं की, फसवणूक झाल्याची जाणीव मला तेव्हा झाली तेव्हा त्यांनी मला दिलेले पैसे संपले. ती म्हणाली की, तिला पैसे तर चांगले मिळाले होते, पण तिला भीती आहे की, तिच्या चेहऱ्याचा वापर चुकीच्या पद्धतीनं होऊ नये. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की, कंपन्या फेक गोष्टींसाठी खऱ्या चेहऱ्याचा वापर करतात. चेहरा वापरण्यासाठी कंपन्या मॉडल्स आणि कलाकारांना चांगले पैसे देतात. पण सामान्य लोकांसाठी ही खूप मोठी बाब असते की, चेहऱ्याचा योग्य वापर व्हावा.