Lokmat Sakhi >Social Viral > कुत्रा आणि घोड्यासोबत महिलेने लावली धावण्याची शर्यत, बघा कोण जिंकलं.... व्हिडिओ व्हायरल

कुत्रा आणि घोड्यासोबत महिलेने लावली धावण्याची शर्यत, बघा कोण जिंकलं.... व्हिडिओ व्हायरल

Viral Video Of A Woman, Horse and a Cat: सोशल मिडियावर काही मजेशीर व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. हा एक व्हिडिओ त्यापैकीच एक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 03:42 PM2022-11-28T15:42:47+5:302022-11-28T15:44:22+5:30

Viral Video Of A Woman, Horse and a Cat: सोशल मिडियावर काही मजेशीर व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. हा एक व्हिडिओ त्यापैकीच एक आहे.

Woman starts race with a dog and a horse, Must see this funny viral video | कुत्रा आणि घोड्यासोबत महिलेने लावली धावण्याची शर्यत, बघा कोण जिंकलं.... व्हिडिओ व्हायरल

कुत्रा आणि घोड्यासोबत महिलेने लावली धावण्याची शर्यत, बघा कोण जिंकलं.... व्हिडिओ व्हायरल

Highlightsआता घोडा या शर्यतीत धावतो आहे, म्हटल्यावर तोच जिंकणार असा सगळ्यांचा समज होणं अगदी साहजिक आहे. पण होतं काही वेगळंच.

सोशल मिडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ (viral video) आणि रिल्स हा आजकाल अनेकांसाठी करमणूकीचा विषय झाला आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे कित्येक रिल्स दररोज नव्याने येत असतात. त्यापैकी काही रिल्स किंवा व्हिडिओ खरोखरच रिफ्रेशिंग असतात तर काही निव्वळ निखळ करमणूक करणारे. सध्या सोशल मिडियावर असाच एक गमतीशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा, एक घोडा आणि एक महिला असे तिघे जण असून त्या तिघांनी चक्क धावण्याची शर्यत (Woman starts race with a dog and a horse) लावली आहे. 

 

@buitengebieden या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून Happiness.. 😊 अशी कॅप्शन त्याला देण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या व्हिडिओला आजवर लाखो लाईक्स मिळाले आहेत. नेमक्या कोणत्या देशातला हा व्हिडिओ आहे, याचा उल्लेख पोस्टमध्ये नाही. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की मधोमध एक रस्ता आहे. रस्त्यावरून एक महिला आणि सोबत तिचं कुत्रं आणि घोडा धावत आहेत आणि आजूबाजूला हिरवीगार झाडं असून सगळंच वातावरण अगदी रमणीय आहे. 

 

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला स्केटिंग करत आहे. आता घोडा या शर्यतीत धावतो आहे, म्हटल्यावर तोच जिंकणार असा सगळ्यांचा समज होणं अगदी साहजिक आहे. पण होतं काही वेगळंच.

ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी

सुरुवातीला घोडा त्या दोघांच्याही मागे असतो. बाकीचे आपल्यापेक्षा जोरात धावत आहेत, हे बघून तो वेग जरा वाढवतो. नंतर सगळ्यात पुढे असणारं कुत्र उगाच भरकटतं आणि डाव्या बाजूला असणाऱ्या शेतात निघून जातं. ते पाहून घोड्याचंही लक्ष विचलित होतं आणि त्याचाही वेग कमी होतो. पण पुन्हा ते कुत्रं तेवढ्याच वेगात परत येतं.. घोडा स्पर्धेत असूनही शेवटी एवढंसं कुत्रं बाजी मारून जातं, हे या व्हिडिओचं वैशिष्ट्य. 

 

Web Title: Woman starts race with a dog and a horse, Must see this funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.