आई-वडील नेहमीच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण, चांगल्या सोई-सुविधा देण्याच्या प्रयत्नात असतात. दिवसरात्र कष्ट घेऊन ते मुलांना स्वत:पेक्षा जास्त जपतात. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असतं. याचीच जाणीव ठेवून काही मुलं आपल्या आईवडीलांना अभिमान वाटेल असे कार्य करून त्यांच्या कष्टाची परतफेड करतात. (Woman surprises parents with business class tickets) इशप्रीत कौर नावाच्या तरूणीनं असंच काहीसं केलं जे पाहून तिचे आई-वडील एकदम चकीत झाले. सध्या इशप्रीत यांच्या आईवडीलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Woman surprises parents with business class tickets Dad says he’ll frame them)
मुलीने आपल्या वडीलांना न सांगता फ्लाईटचे बिझनेस क्लासचे तिकिट त्यांच्यासाठी बूक केले. जेव्हा त्यांना या गोष्टींची जाणीव झाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. हे भावनिक क्षण कॅमेरात कैद झाले आणि त्यांची रिएक्शन पाहून आता सोशल मीडिया युजर्सही भावून होत आहेत. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या मुलीचे वडील म्हणाले की, पहिल्यांदाच आम्हाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. ते चालताना वारंवार हातातील तिकीट पाहत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक या मुलीचं भरपूर कौतुक करत आहेत.
प्रत्येक आई-वडीलांना असं सरप्राईज मिळो अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. अनेकांनी अशी कमेंट केली की प्रत्येकाने आपापल्या आर्थिक स्थितीनुसार आपल्या आई-वडीलांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. या व्हिडिओमधील तिच्या वडीलांची रिएक्शन पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आई-वडीलांसाठी काहीना काही करायला हवं अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाली आहे.