Join us  

ती महिन्यातून फक्त तीनदा करते आंघोळ! तिचे लाखो फॉलोअर्स तरीही तिच्यावर फिदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 7:23 PM

Woman Takes Shower Once In 10 Days : अनेक मुलींना आंघोळ करण्याचा कंटाळा असतो, अशा सगळ्या मुलींसाठी ती प्रेरणा आहे.

ठळक मुद्देया गोष्टीवरुन लोकांनी या तरुणीला बरेच ट्रोल केले असून स्वत:साठी नाही पण किमान लोकांसाठी तरी आंघोळ कर असा सल्ला दिला आहे. मासिक पाळीच्या दरम्यानही तिचे हे रुटीन बदलत नाही असे आयडन सांगते

सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो, टॉयलेटला जातो तसंच आंघोळही करतो. आपल्या नित्यक्रमांपैकी एक असलेली आंघोळ आपलं शरीर तर स्वच्छ करतेच पण मन स्वच्छ करण्यासाठीही आंघोळ गरजेची असते. लहानपणापासून आपल्याला रोज आंघोळ करायची असेच सांगितलेले असते. उन्हाळ्यात किंवा घामाघूम झाल्यावर तर आपण दिवसातून २ किंवा ३ वेळा आंघोळ करतो. पण २ दिवस आंघोळ केली नाही तर आपल्याला कसेतरी व्हायला लागते. काही वेळा तर आंघोळ न केल्याने अंगाला घामाचा वास येतो आणि आपल्याला अस्वच्छ वाटायला लागतं. पण १० दिवस आंघोळ न करता राहा असं कोणी आपल्याला सांगितलं तर मात्र आपल्याला किळस आल्यासारखं होऊ शकेल. पण एक तरुणी आहे जी खरंच १० दिवसांनी एकदा आंघोळ करते (Aydan Jane). 

(Image : Google)

या तरुणीचे नाव आयडन जेन असून ती अवघ्या २३ वर्षांची आहे. अशाप्रकारे १० दिवसांतून एकदा म्हणजेच ही महिला महिन्यातून केवळ ३ वेळाच आंघोळ करते. असे करण्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटण्याचा काहीच परीणाम होत नाही असेही ती महिला म्हणाली. आपले आंघोळ करण्याचे रुटीन एकदम परफेक्ट असून आपली जीवनशैली गेली कित्येक वर्षे बदलली नसल्याचे तिने सांगितले. आयडन टिकटॉकर असून आंघोळ न करण्याबाबत तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. अनेक मुलींना आंघोळ करण्याचा कंटाळा असतो, अशा सगळ्या मुलींसाठी ती प्रेरणा आहे. 

विशेष म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यानही तिचे हे रुटीन बदलत नाही असे आयडन सांगते. पण याचा तिच्या स्वच्छतेवर काहीही परीणाम होत नाही. ना तिचे केस खराब होतात, ना ती अस्वच्छ असते. इतके दिवस आंघोळ न करुनही ती किती फ्रेश दिसते याबाबत तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. लहानपणी आयडनही सगळ्यांप्रमाणेच रोज आंघोळ करत होती. मात्र आता तिने यामध्ये बदल केला आहे. आपल्या या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून पाणी वाचण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे असं ती म्हणते. तुम्ही जर खूप मेहनतीचे काम करत नसाल आणि तुम्हाला घाम येत नसेल तर दररोज आंघोळ करण्याची आवश्यकता नाही असे आयडन म्हणते. या गोष्टीवरुन लोकांनी या तरुणीला बरेच ट्रोल केले असून स्वत:साठी नाही पण किमान लोकांसाठी तरी आंघोळ कर असा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया