Lokmat Sakhi >Social Viral > १४ महिने ‘तिला’ लघवीच झाली नाही; रोज ३ लिटर पाणी प्यायची तरी..महिलेनं सांगितली 'आपबीती'

१४ महिने ‘तिला’ लघवीच झाली नाही; रोज ३ लिटर पाणी प्यायची तरी..महिलेनं सांगितली 'आपबीती'

Woman unable to urinate for 14 months : डॉक्टरांच्या तपासणीत उघड झाले की महिलेला एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे तिची अशी स्थिती झाली होती आणि ती लघवीला जाऊ शकत नव्हती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 02:01 PM2023-03-25T14:01:46+5:302023-03-25T15:13:36+5:30

Woman unable to urinate for 14 months : डॉक्टरांच्या तपासणीत उघड झाले की महिलेला एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे तिची अशी स्थिती झाली होती आणि ती लघवीला जाऊ शकत नव्हती.

Woman unable to urinate for 14 months : Woman unable to urinate for 14 months due to fowler syndrome | १४ महिने ‘तिला’ लघवीच झाली नाही; रोज ३ लिटर पाणी प्यायची तरी..महिलेनं सांगितली 'आपबीती'

१४ महिने ‘तिला’ लघवीच झाली नाही; रोज ३ लिटर पाणी प्यायची तरी..महिलेनं सांगितली 'आपबीती'

प्रत्येकाच्याच शरीराचं कार्य सुरळीत होण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे. पोटातील घातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी सतत पाणी पित राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. पण जास्त पाणी पिणंसुद्धा धोक्याचं ठरू शकतं. असंच एक प्रकरण लंडनमधून समोर आलं आहे. ती महिला गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायची. एक वेळ अशी आली की ती लघवी करूच शकली नाही. (Woman unable to urinate for 14 months due to fowler syndrome)

लंडनमधील रहिवासी असलेली 30 वर्षीय एले एडम्स या महिलेला गेल्या चौदा महिन्यांपासून लघवी करताच येत नव्हती. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या तपासणीत उघड झाले की महिलेला एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे तिची अशी स्थिती झाली होती आणि ती लघवीला जाऊ शकत नव्हती.

तिने आपल्या दुर्मिळ आजाराबद्दल इंग्रजी वेबसाइट डेली स्टारला अधिक माहिती दिली आणि ती या आजाराला कशी बळी पडली हे सांगितले.  ऑक्टोबर 2020 पर्यंत सर्व काही ठीक होते परंतु एका रात्री अचानक तिची तब्येत बिघडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती वॉशरूममध्ये गेली तेव्हा तिला लघवी करता आली नाही.

तपासणीनंतर निघाला दुर्मिळ आजार

यानंतर एलेने जास्त पाणी पिण्याचे ठरवले पण तरीही लघवी करता येत नव्हती. त्यानंतर तिने डॉक्टरांकडे जाण्याचा विचार केला आणि ती हॉस्पिटलला दाखल झाली. जिथे प्राथमिक तपासणीत डॉक्टरांना लघवीच्या पिशवीत एक लिटर लघवी अडकल्याचे आढळले. यानंतर डॉक्टरांनी तिला इमेजिंग कॅथेटर लावले. त्यामुळे तिचा त्रास कमी झाला. पण जे काम ती पूर्वी सहज करत होती, आता तिला त्यासाठी खूप मेहनत करावी लागणार होती.

काही काळासाठी, डॉक्टरांनी तिला सेल्फ-कॅथेटराइज करायला शिकवले आहे. ज्यामुळे तिला खूप मदत झाली… या सर्व गोष्टींनंतर आठ महिन्यांनंतर, एली पुन्हा यूरोलॉजी विभागात गेली. जिथे तिला फॉलर सिंड्रोम असल्याचे समजले. त्यामुळे आता तिला आयुष्यभर कॅथेटरच्या मदतीने लघवी करावी लागणार आहे.

Web Title: Woman unable to urinate for 14 months : Woman unable to urinate for 14 months due to fowler syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.