पंजाबमध्ये अजूनही तरुणांकडून अमली पदार्थांचे सेवन सुरूच आहे. याचे जिवंत उदाहरण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की मुलगी कथितरित्या अवैध ड्रग्जच्या प्रभावाखाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. रिपोर्ट्सनुसार हा व्हिडिओ अमृतसरच्या मकबूलपुरा भागातील आहे. मकबूलपुरा परिसर मोठ्या प्रमाणात नशा करणाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. (Udta punjab amritsar maqboolpura woman under influence of drugs video goes viral watch video here)
व्हिडिओमध्ये तरुणी दारूच्या नशेत आपल्या पायावर उभी राहण्यासाठी धडपडताना दिसत आहे. परिसरातील एका रहिवाशाने व्हिडिओमध्ये आरोप केला आहे की, महिलेने स्वतःला ड्रग्जचे इंजेक्शन दिले आहे. ट्रिब्यूनने डीसीपी मुखविंदर सिंग भुल्लर यांच्या हवाल्याने सांगितले की, आम्ही व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे, व्हिडिओ वरवर पाहता जुना असल्याचं समतंय. हा व्हिडीओ टिपणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.
युरिक एसिड बाहेर काढून सांधेदुखी दूर करेल 'हा' पदार्थ, रोज खा तब्येत राहील चांगली