मोबाईल फोनची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळा, अशा सूचना आपले प्रियजन देत असतात. कारण यामध्ये दुर्घटना होण्याची शक्यता वाढते. मोबाईल फोनमुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेत. काहींना गंभीर दुखापत तर कोणाचा सुदैवाने जीवही वाचला आहे. तरी देखील काहींची ही सवय मोडत नाही. अशा मंडळींचे डोळे उघडवणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे(Woman uses mobile phone while driving train and smashes into another).
ज्यात एक महिला चालक आपल्या मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, समोरून येणाऱ्या ट्रेनकडे तिचे लक्ष जात नाही. तिच्या या एका चुकीमुळे दोन्ही ट्रेनचा अपघात होतो. या चुकीची शिक्षा संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशांना भोगावी लागते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अपघात टाळा.
तर झालं असं, एक महिला चालक ट्रेन चालवत होती. मात्र ट्रेन चालवताना तिचं लक्ष आपल्या मोबाईलकडे जाते. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे आपल्या ट्रेन समोरून दुसरी ट्रेन येत आहे, याचा अंदाज तिला लागत नाही. तिचं लक्ष जाण्यापूर्वीच दोन्ही ट्रेन एकमेकांवर आदळतात. जेव्हा दोन्ही ट्रेनची धडक झाली तेव्हा ही महिला चालक भानावर येते. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. भरदाव वेगानं पळणारी ट्रेन अचानक आदळल्यामुळे प्रवासी देखील अक्षरश: उडून खाली पडतात. काही जणांना तर गंभीर दुखापत सुद्धा झाली. ही संपूर्ण घटना ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या महिलेच्या या करामतीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
driving a train while on a smartphone pic.twitter.com/CZA23skxdv
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 20, 2023
या अपघाताचा व्हिडिओ ''सीसीटीव्ही इडीयट'' या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पहिले असून, सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही घटना रशियामध्ये घडली आहे, अशी माहिती आहे. शिवाय या महिला चालकाला नोकरीवरून काढून टाका अशी मागणी सुद्धा काही जणांनी कमेंटद्वारे केली आहे.