एकटं राहायला कोणाला आवडतं? पण आयुष्यात काही प्रसंग असे येतात ज्यामुळे लोकांना एकटं जगण्याशिवाय पर्याय नसतो. खास प्रसंगाच्या दिवशी म्हणजेच वाढदिवस, लग्न अशा कार्यक्रमांना आपलं कुटुंब आपल्यासोबत असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. (Woman was celebrating her birthday by cutting a cake alone)
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या वाढदिवसाला रेस्टॉरंटमध्ये बसलेली दिसत आहे. ती स्वतःसाठी केक ऑर्डर करते. केकची ऑर्डर दिल्यानंतर ती स्वत: केक कापण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, तेव्हाच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले सर्व लोक आपापल्या जागेवरून उठून महिलेसमोर उभे असल्याचे दिसून येतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांना भावूक करत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आईएएस अधिकारी अवनीश शरण यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, एक वृद्ध महिला तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापत आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला 70 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
उरलेल्या चपातीपासून करा कुरकुरीत, खमंग नाश्ता; ही घ्या सोपी रेसेपी
त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. टिप्पणी करताना वापरकर्त्याने लिहिले आहे – खूप सुंदर व्हिडिओ, इतका हृदयस्पर्शी, जे शब्दात लिहिता येत नाही. या व्हिडीओवर कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिले आहे - हा खूप क्यूट व्हिडिओ आहे.