Lokmat Sakhi >Social Viral > भुईमुगाच्या शेंगांची ॲलर्जी म्हणून 'तिने' लढवली अजब युक्ती, विमान प्रवासात शेंगांची ऐसी की तैसी..

भुईमुगाच्या शेंगांची ॲलर्जी म्हणून 'तिने' लढवली अजब युक्ती, विमान प्रवासात शेंगांची ऐसी की तैसी..

Social Viral: शेंगांची ॲलर्जी असेल तर एखादी व्यक्ती काय करू शकते, याची ही गंमत एकदा वाचा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 12:28 PM2023-08-09T12:28:39+5:302023-08-09T12:44:32+5:30

Social Viral: शेंगांची ॲलर्जी असेल तर एखादी व्यक्ती काय करू शकते, याची ही गंमत एकदा वाचा.

Woman was having nut allergy, so she buy all peanut packets in flight, during her Germany to London journey | भुईमुगाच्या शेंगांची ॲलर्जी म्हणून 'तिने' लढवली अजब युक्ती, विमान प्रवासात शेंगांची ऐसी की तैसी..

भुईमुगाच्या शेंगांची ॲलर्जी म्हणून 'तिने' लढवली अजब युक्ती, विमान प्रवासात शेंगांची ऐसी की तैसी..

Highlightsबघा शेंगांच्या ॲलर्जी पायी विमान प्रवासात तिला काय काय करावं लागलं..

भुईमुगाच्या शेंगा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. खमंग भाजलेल्या शेंगा समोर आल्या तर त्या खाण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. पण लीह विल्यम्स (Leah Williams) नावाच्या एका २७ वर्षीय तरुणीला या शेंगांची भारीच ॲलर्जी (nut allergy) होती. तिच्या आसपास जरी या शेंगा कुणी खात असेल, तरी तिला भयानक त्रास होतो म्हणे. आता ती करत होती विमानाने प्रवास (Germany to London journey). या प्रवासादरम्यान विमानात (flight) नेमक्या भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी हवाई सुंदरी आली. ॲलर्जी असल्याने तिला तर त्या खायच्या नव्हत्याच. पण इतर कोणीही त्या विकत घेऊ नये, म्हणून बघा तिने नेमकं काय केलं...

 

Eurowings flight ने लंडन ते जर्मनी असा तिचा पहिल्या टप्प्यातला विमान प्रवास होता. या प्रवासात तिने विमानातल्या स्टाफला सांगितलं की तिला शेंगांची ॲलर्जी आहे. त्यामुळे त्यांनी अन्य प्रवाशांना त्या विकू नयेत.

मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

कारण एखाद्या प्रवाशाने जरी त्या खाल्ल्या तरी त्याचा तिला त्रास होतो. त्या स्टाफने ते ऐकलं आणि शेंगा विकण्यासाठी आणल्या नाहीत. पण पुन्हा जेव्हा तिचा जर्मनी ते लंडन असा परतीचा होता तेव्हा मात्र तिची पंचाईत झाली. विमानात आल्यावर पुन्हा तिने विमानातल्या स्टाफला तिच्या ॲलर्जीबाबत सांगितलं. पण यावेळी मात्र त्यांनी तसं करायला नकार दिला.

 

त्यामुळे ती हैराण झाली. शेंगा कुणी विकत घेतल्या आणि खाल्ल्या तर काय असा प्रश्न तिला पडला. स्टाफ मेंबर्सला तिने विनंती केली तरीही त्यांनी ऐकलं नाही. मग शेवटी मात्र तिने त्या स्टाफला सांगितलं की या सगळ्या शेंगांचे पैसे मी तुम्हाला देते.

सुहाना खानच्या निळयाशार साडीवर हातानं केलेली सुंदर कशिदाकारी, चमचमती साडी देखणी भारी

पण तुम्ही त्या विकायला आणू नका. शेंगांची तब्बल ४८ पाकीटे विमानात होती. ती सगळीच्या सगळी तिने विकत घेतली. त्याची किंमत जवळपास १५ हजार रुपये एवढी होती. बघा शेंगांच्या ॲलर्जी पायी विमान प्रवासात तिला काय काय करावं लागलं..

 

Web Title: Woman was having nut allergy, so she buy all peanut packets in flight, during her Germany to London journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.