Join us  

याला म्हणतात डोक्यालिटी! चिप्स खाल्ल्यानंतर रॅपर फेकण्याऐवजी अतरंगी महिलेनं बनवली नवी कोरी साडी, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 1:00 PM

Woman wear potato chips packets saree : बटाटा चिप्स रॅपर्सने बनवलेली साडी नेसून तिने इंस्टाग्रामच्या जगात प्रवेश केला तेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले.

आपण सगळेचजण चिप्स खाल्ल्यानंतर रॅपर फेकून देतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या महिलेनं चिप्स  खाऊन झाल्यानंतर रॅपरवर क्रिएटिव्ह काम केलं आहे. चिप्सचे रिकामे रॅपर डस्टबिनमध्ये फेकण्याऐवजी, तिने ते एकत्र बांधले आणि एक चमकदार साडी केली. बटाटा चिप्स रॅपर्सने बनवलेली साडी नेसून तिने इंस्टाग्रामच्या जगात प्रवेश केला तेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या महिलेवर कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. (Woman wear anokhi saree made with potato chips packets watch viral instagram video)

बटाटा चिप्सपासून बनवली साडी

या छोट्या क्लिपच्या सुरुवातीला ती महिला बटाट्याच्या चिप्सचे पॅकेट हातात धरलेली दिसत आहे. ती इंग्रजीत स्टाईलमध्ये बोलते की ओह माय गॉड. तुम्ही म्हणाल की मी असे काहीही घालू शकत नाही. पण मी तुम्हाला दाखवते,  त्यानंतर ती स्त्री त्याच बटाट्याच्या चिप्सच्या अनेक रिकाम्या रॅपर्सपासून बनवलेली साडी नेसलेली दिसते. मात्र, बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते की, ते तिनं काय परिधान केले आहे. या महिलेची सर्जनशीलता पाहून लोक थक्क होत आहेत.

वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी

रिकाम्या चिप रॅपर्सपासून साडी बनवण्याचे हे अप्रतिम कौशल्य BeBadass.in या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले - 'निळे लेस आणि साडीसाठी प्रेम. आतापर्यंत या व्हिडिओला 5 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1 लाख 40 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका व्यक्तीने गंमतीच्या स्वरात लिहिले – साडी असेल तर अशी असावी, नाहीतर नसावी! तर इतर वापरकर्त्यांनी लिहिले की, आम्हा सर्वांना या  स्नॅकसारखे दिसायचे आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल