Lokmat Sakhi >Social Viral > रील बनवण्यासाठी तिनं कुत्र्याला जोरदार लाथ मारली; व्हिडिओ पाहून संतापले लोक, म्हणाले....

रील बनवण्यासाठी तिनं कुत्र्याला जोरदार लाथ मारली; व्हिडिओ पाहून संतापले लोक, म्हणाले....

Woman who kicked dog in a viral video : रील बनवण्यासाठी रस्त्यावरच्या कुत्र्याला लाथ मारण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या कृत्यामुळे प्राणी प्रेमी समुदायाकडून तीव्र टीका झाली आणि त्यांनी व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:57 AM2022-12-01T09:57:50+5:302022-12-01T10:11:13+5:30

Woman who kicked dog in a viral video : रील बनवण्यासाठी रस्त्यावरच्या कुत्र्याला लाथ मारण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या कृत्यामुळे प्राणी प्रेमी समुदायाकडून तीव्र टीका झाली आणि त्यांनी व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला

Woman who kicked dog in a viral video says i am an animal lover in new video | रील बनवण्यासाठी तिनं कुत्र्याला जोरदार लाथ मारली; व्हिडिओ पाहून संतापले लोक, म्हणाले....

रील बनवण्यासाठी तिनं कुत्र्याला जोरदार लाथ मारली; व्हिडिओ पाहून संतापले लोक, म्हणाले....

सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर आपला दिवसच आनंदात जातो. सध्या व्हायरल  झालेल्या व्हिडिओमुळे नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. श्वानप्रेमींना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप दु:ख झाले आहे. किरण काजल 1.21 लाखांहून अधिक फॉलोअर्ससह प्रसिद्ध आहे. (Woman who kicked dog in a viral video says i am an animal lover in new video)

तिने रील बनवण्यासाठी रस्त्यावरच्या कुत्र्याला लाथ मारण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या कृत्यामुळे प्राणी प्रेमी समुदायाकडून तीव्र टीका झाली आणि त्यांनी व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि अनेक तक्रारी अधिकाऱ्यांना मेल केल्या.  या प्रकरणानंतर तरूणीनं व्हिडिओ हटवला आणि दुसर्‍या व्हिडिओमध्ये माफी मागितली आणि दावा केला की तिला प्राणी आणि कुत्रे आवडतात आणि गमतीनं तिनं हा व्हिडिओ बनवला होता.  

तराना सिंग, एक अभिनेत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या, ज्या सध्या यूएसमध्ये आहेत, त्यांनी ट्विटरवर विविध अधिकार्‍यांकडे व्हिडिओबद्दल तक्रार केली आहे. आम्ही तरुणांना आणि मुलांना शिकवतोय का?" असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तिने अनेक अधिकाऱ्यांना टॅग करत ट्विट केले.

कोलेस्टेरॉल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; मधाचा असा करा वापर, थंडीत आजारांपासून लांब राहाल

सिंग यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "फक्त काही लाइक्स मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला लाथ मारताना पाहणे हे निराशाजनक आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. ते समाजासाठी कलंक आहेत,"
 

Web Title: Woman who kicked dog in a viral video says i am an animal lover in new video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.