Lokmat Sakhi >Social Viral > कामाला जायला उशीर झाला, त्यात डेडलाइन डोक्यावर? बाइकवर लॅपटॉप उघडून काम करणाऱ्या ‘तिचं’ काय चुकलं?

कामाला जायला उशीर झाला, त्यात डेडलाइन डोक्यावर? बाइकवर लॅपटॉप उघडून काम करणाऱ्या ‘तिचं’ काय चुकलं?

Bengaluru Woman Works On Laptop While Riding Pillion, Sparks Debate On Work Culture : कामाच्या डेडलाइन, प्रेशर हे सारं हल्ली कुणाला चुकलंय? पाहा नव्या स्ट्रेसचे व्हायरल चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 12:58 PM2023-05-20T12:58:32+5:302023-05-20T13:00:57+5:30

Bengaluru Woman Works On Laptop While Riding Pillion, Sparks Debate On Work Culture : कामाच्या डेडलाइन, प्रेशर हे सारं हल्ली कुणाला चुकलंय? पाहा नव्या स्ट्रेसचे व्हायरल चित्र

Woman works on a laptop while riding pillion in Bengaluru, triggers debate about unrealistic work demands | कामाला जायला उशीर झाला, त्यात डेडलाइन डोक्यावर? बाइकवर लॅपटॉप उघडून काम करणाऱ्या ‘तिचं’ काय चुकलं?

कामाला जायला उशीर झाला, त्यात डेडलाइन डोक्यावर? बाइकवर लॅपटॉप उघडून काम करणाऱ्या ‘तिचं’ काय चुकलं?

डेडलाइन नावाची एक गोष्ट कुणाला चुकली आहे. बायकांना तर घरीदारी डेडलाइन. आणि सतत परफॉर्मन्स प्रेशर. एवढं करुन कुठं तरी कमी पडतोच ही भावना मनात असतेच, लोक त्यात अजून खिजवतात. त्याचंच हे एक रुप, रॅपिडो बाइक हायर करुन त्यावरुन पटकन ऑफिसला जायच्या घाईत असलेली एकजण चक्क मागे बसून लॅपटॉप उघडून काम करते आहे. काय तिच्यावर डेडलाइनचं प्रेशर आहे. तिला पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. कामाचा बोजा, स्ट्रेस आणि काम न संपणाऱ्या डेडलाइन यांनी माणसाचं काय भजं केलं आहे असं अनेकांना वाटलं. पण त्यावर इलाज काय आहे?

सध्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. मात्र बाहेर मोठी कामाची पोझिशन असली तरी घरचं सगळं सांभाळून ऑफिसमधली कामं करावी लागतात.टार्गेट्स पूर्ण करावे लागतात. टार्गेट्ससोबतच टाइम लाईन, डेडलाईन देखील तितक्याच काटेकोरपणे पाळावी लागते. आपल्यापैकी सगळ्यांच्याच आयुष्यात एखादा असा प्रसंग आला असेल जेव्हा आपल्याला आपल्या इतर कितीही महत्वाच्या गोष्टी सोडून ऑफिसच्या कामाला प्राधान्य द्यावे लागते. या सध्याचा कॉर्पोरेट वर्क कल्चरमध्ये, काहीवेळा अगदी सुट्टीच्या दिवशी देखील काम करावे लागते. एवढंच नाही तर स्वतःच्या शिफ्टची वेळ संपल्यानंतरही १२ ते १५ तास काम करावे लागते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. आपण अनेकदा रस्त्याने जाताना मेट्रो, कॅब, बसमध्ये अशा अनेक कॉर्पोरेट मंडळींना लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करताना पाहिले असेल. अशा कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या या लोकांना नक्की इतकं काम असेल का ? किंवा ते काय प्रकारचं इतकं महत्वाचं काम करत असतील की त्यांना प्रवासात देखील लॅपटॉप उघडून काम करावं लागत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे(Woman works on a laptop while riding pillion in Bengaluru, triggers debate about unrealistic work demands).

नेमकं या महिलेने केलं तरी काय ? 

ही घटना आहे बेंगळुरूमधील, या व्हायरल झालेल्या फोटो मध्ये महिला एका रॅपिडो ड्रॉयव्हरच्या मागच्या सीटवर बसलेली दिसत आहे. तिची ऑफिसला जाण्याची घाई या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. निहार लोहिया यांनी त्यांच्या ट्विटरवर अकाउंटवरून या महिलेचा फोटो शेअर केला आहे. ही महिला त्या रॅपिडो ड्रॉयव्हरच्या मागे बसून चक्क मांडीवर लॅपटॉप उघडून ऑफिसचे काम करताना दिसत आहे. हा फोटो १६ मे रोजी ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच ४१००० हून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसेच अनेक लोकांनी यांवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

बायांनो ऐका, नवऱ्याला पाळणाघरात ठेवा आणि मस्त एकटीने फिरायला- शॉपिंगला-मजा करायला जा!

मुसळधार पावसात लागले लग्न, संकट आले तरी त्यांचे प्रेम डगमगले नाही.. व्हायरल व्हिडिओ....

नेटकरी काय म्हणत आहेत ? 
हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यावर चांगलीच चर्चा करायला सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे की, "आदल्या रात्री काम करायचे सोडून ती पार्टी करत बसली असेल त्यामुळे तिचे काम बाकी राहिले असेल." दुसऱ्या युजरने म्हटले आहे की ती, " गुगल मॅप बघत असेल." तिसऱ्या युजरने "खूप बेकार कॉर्पोरेट संस्कृती" असे कमेंट्समध्ये म्हणत कॉर्पोरेट संस्कृतीवर राग व्यक्त केला आहे. एक युजरने म्हटले आहे की, " मी तुमच्या कामाच्या दबावाची कल्पना करु शकतो, परंतु अशाप्रकारे काम करून तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात." जेवढी माणसं तेवढी मतं पण ज्याला त्याला आपलं कामाचं प्रेशर आठवलंच.

Web Title: Woman works on a laptop while riding pillion in Bengaluru, triggers debate about unrealistic work demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.