Join us  

बसायला जागा मिळवायची म्हणून पाहा महिला कशी चढली गाडीत.. कौतुक करावं की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 5:24 PM

Woman’s desperate attempt to enter overcrowded bus through window in northern India : काहींना साडी सावरायला जमत नाही; पण एका महिलेने खिडकीतून बसमध्ये प्रवेश केला..

पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर अनेक भागात होतो (Social Viral). कारण त्या ट्रान्सपोर्टची तिकीटं सामान्यांना परवडणारी स्वस्त असतात. काही भागांमध्ये बस तर काही लोक ट्रेनने प्रवास करतात (Social Media). पब्लिक बस आपण पहिल्याच असतील. त्यात प्रचंड गर्दी असते. बसमध्ये जागा मिळावी म्हणून लोक लाइन लावतात, काहींना जागा मिळते, तर काहींना तसंच उभं रहावं लागतं.

बऱ्याचदा बसमध्ये चढण्यासाठीही जागा मिळत नाही. पण एका महिलने चक्क शक्कल लढवत खिडकीतून बसमध्ये प्रवेश केला. हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला? महिलेने स्टंटबाजी केलीच कशी? पाहा(Woman’s desperate attempt to enter overcrowded bus through window in northern India).

चपाती पचत नाही -वजनही वाढतं? १ पांढरी गोष्ट कालवून कणीक भिजवा, चपाती बनेल फॅट कटर

बसच्या खिडकीद्वारे केला प्रवेश, महिलेची स्टंटबाजी

व्हायरल व्हिडिओ पत्रकार रणविजय सिंह यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील एका छोट्याश्या गावातला आहे. पोस्ट करताच ही क्लिप सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली.

या व्हिडिओमध्ये एक महिला लाल साडी नेसून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. मात्र, तिला चढायला मिळत नाही. त्यानंतर तिचा आटापिटा खिडकीतून बसमध्ये प्रवेश करण्याचा सुरु होतो. ती खिडकीच्या बाहेर लटकते, खिडकीजवळ असणाऱ्या प्रवाश्यांसोबत काहीतरी बोलते. शेवटी तिला खिडकीतून बसमध्ये प्रवेश करण्यास यश मिळते.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांची भन्नाट कमेण्ट

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एकाने 'महिला ऑलिम्पिकची तयारी करत आहे का?' तर दुसऱ्या नेटकऱ्याने 'आमच्या महिला हरियाणाच्या मुलींपेक्षा कमी आहेत का?' तर आणखीन एका युझरने 'भारतीय महिलांनाच या गोष्टी करायला जमतील' अशा गमतीशीर कमेण्ट केल्या आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया