Lokmat Sakhi >Social Viral > ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली अन् बाई वाटाणे सोलत बसली; व्हायरल फोटो पाहून लोक म्हणाले...

ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली अन् बाई वाटाणे सोलत बसली; व्हायरल फोटो पाहून लोक म्हणाले...

Woman’s productivity hack while waiting in traffic :

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 05:31 PM2023-09-21T17:31:15+5:302023-09-21T18:01:35+5:30

Woman’s productivity hack while waiting in traffic :

Woman’s productivity hack while waiting in Bengaluru traffic impresses netizens | ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली अन् बाई वाटाणे सोलत बसली; व्हायरल फोटो पाहून लोक म्हणाले...

ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली अन् बाई वाटाणे सोलत बसली; व्हायरल फोटो पाहून लोक म्हणाले...

बंगळुरू हे ट्रॅफिकसाठी  खास ओळखले जाते. कारण तिथे कमी अंतरावर जाण्यासाठीही बराचवेळ लागतो.  सोशल मीडियावर ट्रॅफिकचे  वेगवेगळे किस्से व्हायरल होत असतात. अलिकडेच असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेय बंगळूरच्या रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका महिलेनं असे काही केले जे पाहून सगळेचजण चकीत झाले. (Woman’s productivity hack while waiting in Bengaluru traffic impresses netizens)

ग्रीन पीस इंडियाच्या (Greenpeace India) रिपोर्टनुसार बंगळूरूमध्ये एका कार चालकांला १० किलोमीटरचं अंतर पास करण्यासाठी जवळपास  १ तास लागला.  अलिकडेच एका महिलेनं सांगितले की तिने ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर आपल्या वेळेचा सदूपयोग कसा केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल झालेली ही पोस्ट दिसून येत आहे. ज्यात  ट्रॅफिकमध्ये अडकलेली एक महिला वाटाणे सोलताना दिसून येत आहे. 

ही पोस्ट @malllige नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये प्रिया नावाच्या युजरने सांगितले की, त्यांनी शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकण्याच्या वेळेचा भाज्या सोलण्यासाठी कसा वापर केला. या पोस्टमध्ये कारच्या फ्रंट सीटवर ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेनं  वाटाणे सोलतानाचा फोटो शेअर केला आहे. 

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स  वेगवेगळ्या रिएक्शन्स देत आहेत.  एका युजरने लिहिलं , हा फोटो मी माझ्या बॉसला पाठवत आहे. दुसऱ्यानं म्हटलं, हे फारच प्रोडक्टीव्ह आहे. तिसऱ्या युजरने लिहिलं, तुम्ही प्रोडकक्टिव्हिटीसाठी नवीन उपाय शोधून काढला. चौथ्या युजरने लिहिलं, पीक अवर्सदरम्यान बंगळूरूमध्ये प्रवास करताना शिकण्यासारखं खूप काही आहे. 

Web Title: Woman’s productivity hack while waiting in Bengaluru traffic impresses netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.