Join us  

१९ व्या वर्षी आई, पन्नासाव्या वर्षी झाली आजी; कमालीचा फिटनेस पाहून विचाराल, सिक्रेट काय तारुण्याचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 6:52 PM

Women Aged 52 Years but Looks Very Young know her Fitness Secret : त्या आपल्याबाबत इन्स्टाग्रामवर नेहमी काही ना काही शेअर करतात. जेणेकरुन इतर लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतील.

ठळक मुद्दे२० सप्टेंबर रोजी जीना ५२ वर्षांच्या होणार असून त्या इतक्या तरुण कशा दिसतात असा प्रश्न त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकालाच पडतो.त्या आपल्याबाबत इन्स्टाग्रामवर नेहमी काही ना काही शेअर करतात. जेणेकरुन इतर लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतील.

आपले वय जसे वाढत जाते तसा आपला चेहरा वयस्कर दिसायला लागतो, शरीर थकत जाते. एकदा आपण चाळीशी पार केली की आपलं वय आपल्या चेहऱ्यावरुन लपत नाही. मात्र जगात काही लोक असे असतात जे कितीही मोठे झाले तरी त्यांचे वय चेहऱ्यावर दिसत नाही. एक कारण म्हणजे त्यांना दैवी देणगी मिळाली असल्याने ते कायम लहानच दिसतात. तर दुसरे कारण म्हणजे हे लोक स्वत:ला इतकं फिट ठेवतात की ते कितीही मोठे झाले ती त्यांचे वय त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी अशीच एक महिला आहे जिला पाहून तिच्या वयाचा अंदाज आपल्याला काही केल्या लावता येऊ शकत नाही. या महिलेचे नाव आहे जीना स्टीवर्ट (Gina Stewart Women Aged 52 Years but Looks Very Young know her Fitness Secret).

(Image : Google)

ही महिला अवघ्या १९ व्या वर्षी आई झाली. तिला ३ मुलं असून तिच्या सगळ्यात मोठ्या मुलीला ८ वर्षांची मुलगी आहे. २० सप्टेंबर रोजी जीना ५२ वर्षांच्या होणार असून त्या इतक्या तरुण कशा दिसतात असा प्रश्न त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकालाच पडतो. मीडिया रिपोर्टनुसार जीना यांना तीन नातवंडे असून त्यांनी स्वत:ला खूप मेंटेन ठेवले आहे. या सगळ्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जीना नियमीतपणे करत असलेला व्यायाम हे आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीना नियमितपणे व्यायाम करतात. इतकेच नाही तर आपण ज्याप्रमाणे व्यायामाने फिट आहोत तसेच इतरांनीही असावे यासाठी त्या सगळ्यांना मोटीवेट करतात. यासाठी त्या आपल्याबाबत इन्स्टाग्रामवर नेहमी काही ना काही शेअर करतात. जेणेकरुन इतर लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतील.

(Image : Google)

विशेष म्हणजे जीना फिट राहण्यासाठी फक्त आणि फक्त ऑरगॅनिक फूडच खातात. प्रिझर्वेटीव्ह घातलेले किंवा जंक फूड खाणे त्या टाळतात. जीना म्हणतात, जसे आपले वय वाढत जाते तशी आपली जीवनशैली बदलत जाते. या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केले तर आपली जीवनशैली खराब होते. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. हाय प्रोटीन असलेले डाएट घेणे आणि डाएटमध्ये जास्तीत जास्त भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे जीना यांचे म्हणणे आहे. तसेच ब्यूटीच्या बाबतीत जीना नियमितपणे रोजशीप ऑईलचा वापर करतात. त्यामुळे त्यांची त्वचा सैल न पडता आहे तशी राहण्यास मदत होते आणि त्यांचे वाढलेले वय त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया