Lokmat Sakhi >Social Viral > ‘ले के पहला पहला प्यार..’- मुंबईत स्टेशनवर तरुणीचा भन्नाट डान्स; कशासाठी हे उद्योग हाच प्रश्न..

‘ले के पहला पहला प्यार..’- मुंबईत स्टेशनवर तरुणीचा भन्नाट डान्स; कशासाठी हे उद्योग हाच प्रश्न..

Women Dance on Mumbai Railway Platform Viral Video : तिच्या डान्स मूव्हज इतक्या फास्ट आहेत की ती प्रोफेशनल डान्सर असावी असे वाटते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 04:12 PM2023-05-19T16:12:29+5:302023-05-19T16:14:24+5:30

Women Dance on Mumbai Railway Platform Viral Video : तिच्या डान्स मूव्हज इतक्या फास्ट आहेत की ती प्रोफेशनल डान्सर असावी असे वाटते.

Women Dance on Mumbai Railway Platform Viral Video : 'Le Ke Pehla Pehla Pyaar..'- A girl's fantastic dance at a station in Mumbai; Why this industry is the question.. | ‘ले के पहला पहला प्यार..’- मुंबईत स्टेशनवर तरुणीचा भन्नाट डान्स; कशासाठी हे उद्योग हाच प्रश्न..

‘ले के पहला पहला प्यार..’- मुंबईत स्टेशनवर तरुणीचा भन्नाट डान्स; कशासाठी हे उद्योग हाच प्रश्न..

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं. अगदी आयफेल टॉवरवरील डान्सपासून ते रस्त्यात किंवा अगदी कुठेही डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ज्यांना डान्सची आवड असते ते लोक मनसोक्तपणे यामध्ये डान्स करताना दिसतात. एखाद्या गोष्टीचे वेड असणे ठिक आहे पण म्हणून अशाप्रकारे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे डान्स करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आहे. आवड जपायची असेल तर त्यासाठी क्लास लावणे, कार्यक्रम किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होणे अशाप्रकारचे बरेच मार्ग असतात. मात्र अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यामागे काय उद्देश असावा हा प्रश्नच आहे (Women Dance on Mumbai Railway Platform Viral Video). 

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर एका मुलीने नुकताच एक डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये या तरुणीने काळ्या रंगाची कार्गो पॅंट. काळा स्लिव्हलेस क्रॉप टॉप घालता असून ती रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसते. लेके पहला पहला प्यार या गाण्यावर ती अतिशय भन्नाट असा डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्स मूव्हज इतक्या फास्ट आहेत की ती प्रोफेशनल डान्सर असावी असे वाटते. डोळ्याची पापणी लवण्याच्या आत ती डान्सच्या स्टेप्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, तिची एनर्जी याचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. 

द श्रेया सिंग ऑफीशियल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबई जादुनगरी आहे अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. साधारण महिन्याभरापूर्वी अवलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल ७० हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. इतकेच नाही तर या व्हिडिओवर असंख्य कमेंटसचा पाऊस पडला असून या मुलीच्या आत्मविश्वासाचे आणि तिच्या टॅलेंटचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. याआधीही रेल्वे स्टेशनवर, मेट्रोमध्ये, रेल्वेमध्ये डान्स करणाऱ्या मुलींचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 

 

Web Title: Women Dance on Mumbai Railway Platform Viral Video : 'Le Ke Pehla Pehla Pyaar..'- A girl's fantastic dance at a station in Mumbai; Why this industry is the question..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.