Join us  

कोरियन सासूसोबत सुनेचा तेलगू गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 11:14 AM

Women Dance on Telegu Song With Korean Mother In Law Viral Video : डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आपल्याला व्हिडिओतून सहज दिसतो

ठळक मुद्देपरदेशात भारतीय गाण्यांवर डान्स करणाऱ्यांचे बरेच व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात भर रस्त्यात अशाप्रकारे तेलगू गाण्यावर डान्स करणाऱ्या या सासू-सुना किती उत्साही असतील हेच यातून दिसून येते

डान्सचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी परदेशी लोक भारतीय बॉलिवूड गाण्यांवर डान्स करतात तर कधी लहान मूल एखाद्या गाण्याच्या स्टेप्स अगदी परफेक्ट सादर करुन आपल्याला आश्चर्यचकीत करते. सोशल मीडियामुळे काही क्षणात हे व्हिडिओ जगभरात पोहोचतात आणि हजारो, लाखो लोक ते आवडीने पाहतातही. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून आपल्याला नक्कीच छान वाटेल. कारण यामध्ये २ महिला अतिशय आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. तरुणी भारतीय असून तिची सासू कोरीयन आहे (Women Dance on Telegu Song With Korean Mother In Law Viral Video). 

या दोघीही तेलगू गाण्यावर अतिशय सुंदर असा डान्स करतात. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आपल्याला व्हिडिओतून सहज दिसतो. या दोघींनी मोठा घेर असलेले वन पीस घातले असून सुनेला पाहून सासू तिच्यासारख्या अॅक्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. या सासुने डोळ्यावर गॉगल घातला असून गाण्याचे बोल कळत नसले तरी ती अतिशय उत्साहाने डान्स करताना दिसत आहे. सिन्नडो या गाडलेल्या तेलगू गाण्यावर या दोघींची पावले थिरकताना दिसतात. 

हा डान्स या दोघी कोणत्या सभागृहात करत नसून भर रस्त्यात करत असल्याचे दिसते. इन्स्टाग्रामवर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला असून आतापर्यंत हजारो जणांनी तो पाहिला आहे. इतकेच नाही तर ७३ हजार हून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी हा व्हिडिओ पाहून आपल्याला आनंद झाला असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशाप्रकारे परदेशात भारतीय गाण्यांवर डान्स करणाऱ्यांचे बरेच व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात आणि त्यामुळे भारतीय संगिताविषयी परदेशी नागरिकांना असलेले आकर्षण आपल्याला दिसून येते. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य