सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओ निव्वळ विनोदी असतात, तर काही व्हिडिओ खरोखरच वेळ काढून बघायला पाहिजेत, असे असतात. आता सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी नृत्य करते आहे (Women doing dance while driving cycle) आणि तिचे नृत्यकौशल्य खरोखरच अफाट आहे. स्वत:चा भार पेलत ती ज्या पद्धतीने नाचते आहे, ते खरोखरच बघण्यासारखे आहे.
Santosh Sagar या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने गरबा- दांडिया खेळताना जशी वेशभुषा करतात, तशा पद्धतीचे कपडे घातले आहेत.
ओघळलेले दंड सुंदर-सुडौल करण्यासाठी शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायाम, आर्म फॅट समस्येवर उत्तम उपाय
त्यामुळे ती नेमकी राजस्थानची की गुजरातची याचा अंदाज येत नाहीये. या तरुणीचे विशेष कौतूक यासाठी की ती लेहेंगा घालून सायकल चालवत आहे. एवढेच नाही. तर सायकल चालवताना चक्क दोन्ही हात तिने सोडून दिलेले आहेत. हात हलवत ती छान नृत्य करते आहे. म्हणजेच सायकलचा संपूर्ण बॅलेन्स तिने सावरून ठेवला आहे.
एवढ्यावरच ती थांबलेली नाही. तर तिच्या डोक्यावर एक मातीचा कलश किंवा मटके आहे. ते मातीचे मटके डोक्यावर पेलून धरत, दोन्ही हातांनी नृत्य करत सायकल चालवणे, अशा पद्धतीचा तिचा सगळा खटाटोप सुरू आहे.
दसऱ्याला करा झेंडूच्या फुलांची आरास, सोप्या पण आकर्षक रांगोळ्यांचे १० सुंदर प्रकार
त्यामुळेच तर तिचे विशेष कौतूक वाटते आहे. हा सगळा व्हिडिओ तिने एका हायवे प्रमाणे दिसणाऱ्या मोठ्या रस्त्यावर शूट केला आहे. रस्त्यावर शुकशुकाट आहे, पण तरी योग्य खबरदारी घ्यायला पाहिजे, असे व्हिडिओ एखाद्या मैदानावर शूट करायला पाहिजेत, असा सल्लाही तिला नेटिझन्सनी दिला आहे.