काही लोकांसाठी, व्यायाम ही एक दैनंदिन दिनचर्या आहे जी नियमित पाळली जाते आणि इतर लोक व्यायाम आवश्यकतेनुसार करतात. आणि जेव्हा तुम्ही थकलेले असाल आणि तुमच्या शेवटच्या व्यायामासाठी मशीनची वाट पाहत असाल तेव्हा दुसर्याने मशीन ताब्यात घेतल्यास काय होईल.... (Women Fighting in Gym)असंच काहीसं घडलं या महिलेसोबत जी जिममध्ये लेग्स मशीनवर आपला सेट पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या महिलेची वाट पाहत होती. पण, त्यानंतर तिसऱ्या महिला आणि तिचा धक्का लागला. मग मारामारीला सुरूवात झाली. (Women slap each other fight over gym equipment in viral video)
Kalesh Inside GYM for Smith Machine pic.twitter.com/KXy6v9UyWj
— r/Bahar Ke Kalesh (@Baharkekalesh) October 9, 2022
ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, एक महिला जिममध्ये मशीनवर तिचा सेट पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याची वाट पाहत आहे. तिचा सेट पूर्ण होताच ती बाई मशीन वापरायला निघाली. मात्र, तेवढ्यात तिसरी महिला अचानक तेथे आली आणि तिने ते उपकरण बंद केले. आणि मग एक भयंकर मारामारी सुरू झाली. दोन्ही महिलांनी एकमेकांना कानाखाली मारली आणि धक्काबुक्की सुरू केली आणि एकमेकांचे केसही ओढले.
करवा चौथसाठी लेटेस्ट मेहेंदी डिजाईन्स; फक्त ५ मिनिटात काढा आकर्षक मेहेंदी पॅटर्न्स
ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. व्यायाम करण्यासाठी रोज व्यायामशाळेत जात असलेल्यांनी हा व्हिडिओ स्वत:शी रिलेट केला आहे.