Lokmat Sakhi >Social Viral > Women Gives Birth to Miracle Baby : आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि..

Women Gives Birth to Miracle Baby : आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि..

Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages : २०१० मध्ये लग्न केले आणि दरवर्षी ती गर्भवती राहिली, परंतु गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तिचा नेहमीच गर्भपात व्हायचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 04:19 PM2022-04-14T16:19:08+5:302022-04-14T17:55:22+5:30

Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages : २०१० मध्ये लग्न केले आणि दरवर्षी ती गर्भवती राहिली, परंतु गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तिचा नेहमीच गर्भपात व्हायचा.

Women Gives Birth to Miracle Baby : Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages in 12 years | Women Gives Birth to Miracle Baby : आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि..

Women Gives Birth to Miracle Baby : आश्चर्य! 12 वर्षांत 13 मिसकॅरेज, पण आई व्हायचं म्हणून तिनं परत जीव धोक्यात घातला आणि..

(Image Credit- Mirror.co.uk)

आई होण्याची  भावनाच खूपच  सुखावणारी असते. गरोदरपणातला प्रत्येक क्षण दिवस आई वडील आपल्या लाडक्या बाळाच्या प्रक्षितेत घालवतात. पण अनेकदा आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांना भयंकर त्रासातून जावं लागतं. कधी मानसिक तर कधी शारिरीक त्रासांमुळे जोखिम वाढण्याची शक्यता असते. सोशल मीडियावर आई बनलेल्या अशाच एका महिलेचा थरारक अनुभव व्हायरल होत आहे. (Woman gives birth to miracle baby after she suffered 13 miscarriages in 12 years)

12 वर्षांत 13 वेळा गर्भपात झाल्यानंतर एका  महिलेने अखेर मुलाला जन्म दिला आहे. ३२ वर्षीय महिलेचं नाव लिऊ असे नाव आहे. तिने चीनच्या वुहान विद्यापीठाच्या झोंगनान हॉस्पिटलमध्ये सिझेरियन सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला. चीनच्या वुहान शहरातील झिनझोउ जिल्ह्यातून आलेल्या लिऊने २०१० मध्ये लग्न केले आणि दरवर्षी ती गर्भवती राहिली, परंतु गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात तिचा नेहमीच गर्भपात व्हायचा.

2017 मध्ये डॉक्टरांनी तिला सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस (SLE) नावाचा ऑटोइम्यून रोग असल्याचे निदान केले.  तिला डॉक्टरांनी सांगितले होते की हे कदाचित तिच्या गर्भपाताचे कारण आहे कारण हा रोग मानवी शरीरातील प्रत्येक प्रणालीवर हल्ला करतो. SLE हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते, ज्यामुळे प्रभावित अवयवांमध्ये जळजळ आणि पेशींचे नुकसान होते. डॉक्टरांनी तिला मूल होऊ देण्याचे प्रयत्न थांबवण्यास सांगितले. तरीही तिनं डॉक्टरांचं म्हणणं मनावर घेतलं नाही आणि त्यामुळे गर्भपात होण्याचे सत्र सुरू राहिले

12 वर्षांत 13 गर्भपात झाल्यानंतर, डॉक्टरांच्या लक्षात आले की तिचे शरीर कमकुवत झाले आहे आणि तिला हायपोथायरॉईडीझमचा त्रास होऊ लागला. ही अशी स्थिती आहे जिथे थायरॉईड स्वतःचे हार्मोन पुरेसे तयार करू शकत नाही आणि ते रक्त प्रणालीपर्यंत पोहोचवू शकत नाही.

ऑगस्ट 2021 मध्ये तिच्या 14व्या गर्भधारणेची पुष्टी झाली आणि तिने 22 मार्च रोजी बाळाला जन्म दिला. तिच्या गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात, रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे आणि इतर अस्वस्थता  उद्भवल्यानंतर गर्भपाताच्या चिंतेत लिऊ रुग्णालयात गेली.  डॉक्टरांनी तिच्यावर गर्भपात संरक्षण आणि संसर्गविरोधी प्रक्रिया केली आणि तिच्यासाठी एक नाजूक गर्भ संरक्षण उपचार योजना तयार केली.

उन्हामुळे डोळ्यांची जळजळ, चेहरा, केसही खराब झालेत? डॉक्टरांनी सांगितले तब्येत सांभाळण्याचे उपाय

जन्म देण्याच्या तिच्या दृढनिश्चयी प्रयत्नांनंतर अखेरीस लिऊनं सिझेरियन सेक्शनद्वारे प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला गेला. तिला तीन दिवसांनंतर 25 मार्च रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले. डॉक्टर गुओ जुआनजुआन यांच्या मते, प्रसूतीच्या प्रयत्नात तिने ज्या समस्यांचा सामना केला त्यांच्यापैकी एक, SLE मुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

जानेवारीमध्ये, द मिररने आणखी एका महिलेबद्दल सांगितले होते. जिने पुन्हा गर्भवती होण्याची  स्वप्ने सोडली होती. एम्मा व्हाईट यांचे 20 वर्षांत 16 गर्भपात झाले. पण गर्भधारणेनंतर दोन चमत्कारिक बाळांना जन्म दिल्याचा आनंद तिने शेअर केला.

Web Title: Women Gives Birth to Miracle Baby : Women gives birth to miracle baby after she sufferes 13 miscarriages in 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.