पाणी हेच जीवन हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. पाणीटंचाईच्या बातम्याही ऐकलेल्या असतात, पाहिल्या-वाचल्या जातात. पण शहरांत अनेकदा त्याची दग जाणवत नाही. खेडोपाडी मात्र पावसाळ्यातही अनेकींना पिण्याच्या पाण्याचे हंडे वहावे लागतात. त्यासाठी जीवही धोक्यात घालावा लागतो. भर पावसात डोक्यावरुन हंडे वाहणाऱ्या आयाबायांचा असाच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सध्या चर्चेत आहे. व्हायरलही झाला आहे. ज्यामध्ये पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे, पूल नाही म्हणून तीन महिला एका बारीक ओंडक्यावरुन नदी ओलांडून जात आहेत. (Women crossing river carrying) व्हिडिओ नेमका कुठला हे कळलं नसलं तरी पावसाळ्यात ग्रामीण भागात अजूनही हे दृश्य अपवाद नाही. अनेकींच्या वाट्याला असं पाणी वाहणं येतंच. (Women inspiring video viral video of women crossing river carrying heavy containers on head)
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर rvcjinsta नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 'जीवन संघर्ष’ सांगणारी ही पोस्ट. जगणं अवघड, भर पावसातही प्यायला पाणी मिळावं म्हणून वणवण करावी लागते. पूल नसतात. वाहून जातात. डोक्यावरुन हंडे न्यावे लागतात. घोटभर पाण्यासाठीची ही वणवण घरात सुरक्षित राहून किंवा पावसाळी पर्यटनाला जाऊन नाही कळू शकतं.
थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. एका यूजरने लिहिले की, 'जीवन सोपे नाही.' तर त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, आमची समस्या त्यांच्यासमोर काहीच नाही.'
प्रार्थना आणि सहवेदना दोन्हीपलिकडे नेट युजर्स काय करु शकतात असाही प्रश्न आहेच. तर कुणी लिहिलं की, 'स्त्रियांचा आदर करा.'