देशभरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या नऊ दिवसांमध्ये लोक माता दुर्गेच्या नऊ विविध रूपाची मनोभावे पुजा करतात. तसेच नऊ दिवस गरब्याचेही आयोजन केले जाते. गरबा खेळण्याची प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टाईल असते. गरबा म्हटले की डोळ्यापुढे येतात दांडिया, गोल फेर धरून नाचणे, गुजराती भाषेतील पारंपारिक गाणे लावून घेरदार चणिया - चोली घालून मस्त बेभान होऊन नाचणे. आजकाल या पारंपरिक गरब्याने बदलत्या काळानुसार आगळेवेगळे रूप धारण केले आहे. आपण बघतोच काही ठिकाणी फॅन्सी ड्रेस, मोठमोठे ऑर्केस्ट्रा, स्पेशल थीम, सेलीब्रिटीज बोलवून अगदी मोठ्या धुमधडाक्यात गरबा खेळला जातो(Women In Rajkot Perform 'Garba' On Motorcycles And Cars With Swords In Their hands).
गुजरात गरब्यासाठी (Women perform with swords while riding bikes, cars during Navratri) सर्वाधिक प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या निमित्ताने गुजरातमधील राजकोटमध्ये अनोखा रास गरबा पाहायला मिळाला. गरबा करतांना लोक दांडिया, टाळ्या यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करतात. पण अलिकडेच एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला अशा काही आगळ्यावेगळ्या स्टाईलने (Women Performs Garba On Bikes, Cars With Swords In Hands) गरबा खेळत आहेत की नेटकरी ते पाहून थक्कच झाले. या व्हिडीओ मधील स्त्रिया व मुलींनी हातात तलवारी घेऊन बुलेट, स्कूटर, जीपवर स्वार होऊन गरबा खेळल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सर्वजण त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत(Women Perform 'Garba' On Vehicles With Swords in Rajkot).
या अनोख्या गरब्याची गोष्ट...
गुजरातमधील राजकोटमधून सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला हातात तलवार घेऊन बाइक आणि कारवर 'गरबा' करताना दिसत आहेत. गुजरातमधील राजकोट येथील राजवी महल या राजघराण्याच्या प्रांगणात रास गरब्याचा अनोखा कार्यक्रम झाला. 'तलवार चालवणे' ही गुजरातची एक पारंपारिक संस्कृती आहे. पारंपारिक 'राजपुताना' पोशाख परिधान करून महिलांनी दुर्गा देवीच्या सन्मानार्थ 'तलवार रास' सादर केला. तसेच या व्हिडिओमध्ये महिलांचा एक ग्रुप दुचाकीवरून येतो. यामध्ये एक महिला दुचाकी चालवते आणि दुसरी महिला मागच्या सीटवर उभी राहून आपली तलवार हवेत फिरवताना दिसत आहे. यावेळी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित होते.
भगिनी सेवा फाऊंडेशन संस्थेतर्फे या रास गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलींना तलवारबाजी शिकता यावी आणि स्वतःचे संरक्षण करता यावे यासाठी गरब्यात तलवारीचा वापर करण्यात आला. तरुणी व महिला हातात तलवारी घेऊन गरबा खेळत होत्या. यंदा नवरात्रीमध्ये महिलांनी केवळ तलवार रासच नाही तर बुलेट, बाइकवर तलवारी फिरवत गरबाही केला. संघटनेच्या इतर महिलांनी जीपवर बसून गरब्याचे ताल धरत तलवार नृत्य सादर केले. हे दृश्य अप्रतिम आणि पाहण्यासारखे होते.
स्वरा भास्करला असे का वाटते की, आपण सगळेच कधीच आईचे पुरेसे आभार मानत नाही ?
#Watch | Women in Rajkot perform '#Garba' on motorcycles and cars with swords in their hands, on the third of #Navratri
— Hindustan Times (@htTweets) October 18, 2023
(📹: ANI) pic.twitter.com/XdRXb5lJwx
संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...
अशी झाली सुरुवात...
संस्थेच्या संचालिका कादंबरी बा जडेजा या राजघराण्यातील आहेत. तलवार रासच्या माध्यमातून राजपूत घराण्याची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेमध्ये २५ मुलींना सराव देण्यात आला, परंतु आज संस्थेने ३०० हून अधिक महिलांना तलवार शिकवली आहे, ज्यामुळे महिलांना स्वतःचे संरक्षण करता येईल आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल. तलवारबाजी शिकल्याने मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्या समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींना तोंड देऊ शकतात, असे संस्थेच्या संचालिका यांचे मतं आहे.
गेल्या १४ वर्षांपासून तलवार रासचे आयोजन...
भगिनी सेवा फाउंडेशन ट्रस्ट गेल्या २६ वर्षांपासून अशा आगळ्यावेगळ्या गरब्याचे आयोजन करण्यात कार्यरत आहे. या संस्थेने गेल्या १४ वर्षांपासून तलवार रास गरबा ही संकल्पना सुरू केली आहे. या तलवार रासमध्ये १० ते ६० वर्षे वयोगटातील महिला व मुली सहभागी होतात. राजपूत घराण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी येथे मुलींनी देवी मातेच्या पूजेबरोबरच तलवारबाजीचे धडे देखील गिरवले आहेत. इथल्या मुली व स्त्रिया रोज २ तास तलवारबाजीचा सराव करतात. गुजरातमधील या तलवार रासने गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्येही आपके नाव नोंदवले आहे.