Join us  

हॉटेलमध्ये हेअर ड्रायर वापरलं तर म्हणे द्या १ लाख रुपये, वाचा अजब प्रकार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 9:44 AM

Women Receive shocking bill of 1400 Dolor after using hair dryer in Hotel : मनस्तापासाठी दंडाची आकारणी करण्यात आली होती.

आपण परदेशात कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी राहायला गेलो आणि आपल्याला त्याठिकाणचे नियम माहित नसतील तर आपण कोणतीही गोष्ट करताना १०० वेळा विचार करतो. कारण याठिकाणी काही चुकीच्या गोष्टी केल्याने लगेचच दंड भरावा लागण्याची शक्यता असते. नुकताच असाच प्रकार एका महिलेसोबत घडला. केली नावाची ही महिला ऑस्ट्रेलियातील पर्थ याठिकाणी राहण्यासाठी गेली होती. एक कॉन्सर्ट अटेंड करण्यासाठी ती एका हॉटेलमध्ये राहिली (Women Receive shocking bill of 1400 Dolor after using hair dryer in Hotel ).

 बाहेर जाताना तयार होण्यासाठी केली हिने आपल्याकडील हेअर ड्रायर वापरला. या ड्रायरमुळे हॉटेलचा फायर अलार्म वाजला आणि काही मिनीटांतच अग्निशामक दलाचे लोक याठिकाणी पोहोचले. ही घटना घडल्यानंतर केली हिने लगेचच हॉटेलमधून चेक आऊट केले. मात्र त्यानंतर ३ दिवसांनी तिच्या अकाऊंटमधून अचानक १४०० डॉलर म्हणजे १ लाख १० हजार  कापले गेल्याचे तिला कळाले. थोडी चौकशी केल्यानंतर फायर अलार्म वाजल्यामुळे तिला दंड भरावा लागल्याचे तिच्या लक्षात आले. 

यामध्ये फायर आणि इमर्जन्सी सर्व्हीसेससोबतच हॉटेलनेही केलीला दंड लावला होता हे तिच्या लक्षात आले. हॉटेलने आपल्याकडे असे काही झाल्यावर दंड आकारण्यात येईल असे नियमावलीत नमूद केलेले होते. मात्र केलीने हॉटेल प्रशासनाशी बराच वाद घातल्यानंतर तिला तिचा दंड परत देण्यात आला. आग लागलेली नसतानाही सर्व यंत्रणेला काम करावे लागल्याने महिलेकडून हा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे त्यांना झालेल्या मनस्तापासाठी दंडाची आकारणी करण्यात आली होती. 

टॅग्स :सोशल व्हायरल