Lokmat Sakhi >Social Viral > ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...

ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...

Social Viral: आपण एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाला बोलावलं आणि ते आलेच नाहीत, तर वाईट वाटणं अगदी साहजिक आहे.. तिलाही असंच वाईट वाटलं म्हणून तिने थेट असं काहीतरी टोकांचं पाऊल उचललं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 04:17 PM2022-08-17T16:17:03+5:302022-08-17T16:17:53+5:30

Social Viral: आपण एखाद्या कार्यक्रमासाठी कुणाला बोलावलं आणि ते आलेच नाहीत, तर वाईट वाटणं अगदी साहजिक आहे.. तिलाही असंच वाईट वाटलं म्हणून तिने थेट असं काहीतरी टोकांचं पाऊल उचललं..

Women resigns from job because..... Social media is stunned because of the reason for resignation!  | ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...

ऑफिसमधल्या ७० सहकाऱ्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण, आला फक्त एक; म्हणून तिने ‘असं’ टोकाचं पाऊल उचललं...

Highlightsतिला राग येणं साहजिक आहे, पण रागाच्या भरात तिने जे काही केलं ते अनेकांना पटलेलं नाही..

आपल्याकडचा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जोपर्यंत आपले जवळचे लोक येत नाहीत, तोपर्यंत कार्यक्रमाची शोभा काही वाढत नाही. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाचीच अशी अपेक्षा असते की आपण आमंत्रित केलेले सगळे लोक कार्यक्रमाला यावेत.. या चीनमध्ये (china) राहणाऱ्या एका तरुणीलाही तसंच वाटत होतं.. तिने ज्यांना बोलावलं आहे, त्या सगळ्यांनी तिच्या लग्नाला यावं, अशी एवढी साधी तिची अपेक्षा होती. पण झालं मात्र वेगळंच.. म्हणूनच तर तिचा हा किस्सा सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे. (Women resigns from job)

 

टीएन व्हायरल डेस्क यांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील एका तरुणीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी तिला तिच्या ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांना बोलवायचं होतं.

इंग्रजीतून सांगितली सत्यनारायणाची कथा! फाडफाड इंग्रजीत बोलत पूजा सांगणाऱ्या गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

पण एकाला बोलवा आणि दुसऱ्याला सोडा, असं बरं वाटत नाही. त्यामुळे मग तिने ऑफिसमधल्या तब्बल ७० लोकांना लग्नासाठी आमंत्रित केलं. लग्नाच्या तब्बल २ महिने आधीच प्रत्येकाला आमंत्रण  पत्रिकाही दिली. पण लग्नाच्या दिवशी पाहते तर काय, सगळं उलटंच झालं होतं. त्या ७० जणांपैकी तिची फक्त एक मैत्रिण सोडली तर इतर कुणीही आलेलं नव्हतं. कुणीच आलेलं नाही, याचं तिला खूपच वाईट वाटलं, पण त्याहीपेक्षा ही गोष्ट तिला भयंकर  अपमानजनक वाटली. 

 

शिवाय एवढ्या सगळ्या लोकांचं अन्न वाया गेलं, ते वेगळंच. या सगळ्या प्रकरणाचा तिला असा राग आला की त्या रागाच्या भरात तिने चक्क नोकरीचा राजीनामाच देऊन टाकला... तिला राग येणं साहजिक आहे, पण रागाच्या भरात तिने जे काही केलं ते अनेकांना पटलेलं नाही.. तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की असे सहकारी असतील, तर त्या ऑफिसमध्ये काम न केलेलंच बरं. 


 

Web Title: Women resigns from job because..... Social media is stunned because of the reason for resignation! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.