सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. कण्टेण्टच्या नावाखाली नसते उपदव्याप करतात. काही महिला कुकिंगमध्ये काहीतरी प्रयोग करतात, आणि नेटकऱ्यांकडून ट्रोल होतात (Social Viral). तर काही मुली नसती फॅशन करून लोकांच्या हासण्याचं कारण बनतात (Women Troll). तर काही महिला कॉमन अशा वाटणाऱ्या गोष्टी करून व्हायरल होतात. सध्या अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका महिलेने फ्लोइंग पदर आणि साडी सावरत बसमध्ये कसं चढायचं? अन् कसं उतरायचं? हे सांगितलं.
साडीचा पदर झुळझुळत मोकळा सोडायला अनेकींना आवडते. मोकळ्या पदर सोडून साडीमध्ये काही महिलांना चालताही येत नाही. पण तिने बस कशी पकडायची हे सांगितलं. बघायला गेलं तर, ही कॉमन गोष्ट आहे. पण हीच कॉमन गोष्टीचा तिने व्हिडिओ तयार केला, आणि नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं(Women shares how to carry saree while catching bus; Viral Video).
व्हिडिओ व्हायरल होण्यामागे नक्की कारण काय?
'वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है' हा डायलॉग हा व्हिडिओ पाहून लक्षात येतो. यात महिलेने पांढऱ्या-गुलाबी रंगाची फ्लोरल साडी नेसली आहे. सोबत तिने पर्स देखील कॅरी केली आहे. तिने पदरासोबत साडी सावरत पर्स कशी हँडल करायची हे सांगितलं आहे.
उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत
तिने व्हिडिओमध्ये पर्स मागे न ठेवता डाव्या हाताजवळ घट्ट पकडून ठेवा असं सांगितल. कारण पर्समधून साहित्य कोणी चोरून नेऊ नये, यासाठी तिने ही युक्ती सुचवली. नंतर ती फ्लोइंग पदर उजव्या हाताकडून डावीकडच्या बाजूने घ्यायला सांगते, आणि डाव्या हातानेच निऱ्या पकडा. असं म्हणत ती बसमध्ये चढते आणि उतरते सुद्धा. खरंतर ही गोष्ट प्रत्येक महिलेला ठाऊक आहे. पण तिने यावर व्हिडिओ केल्याने ती ट्रोल होत आहे.
नेटकऱ्यांनी पाडला कमेण्टचा पाऊस
नॉनस्टिकचा तवा-कढई कोटिंग गेलं म्हणून फेकून द्यावी की वापरली तर चालते? नेमकं खरं काय..
व्हायरल व्हिडिओला हजाराच्या घरात व्हिव्हज मिळाले असून, अनेकांनी मजेशीर कमेण्ट करीत ट्रोल केलं आहे. एकाने 'ताई श्वास कसा घ्यायचा हे सांग', तर दुसऱ्याने 'ताई बसमध्ये उजवा पाय आधी टाकायचा का डावा? बायको बस थांबवून तुमच्या उत्तराची वाट बघत आहे.' असं म्हणत व्हिडिओला ट्रोल केलं आहे.