महिला आणि त्यांचं शॉपिंगचं वेड, याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असणार. पण असा हा भन्नाट किस्सा तुम्ही कदाचित पहिल्यांचदा ऐकाल. कोणत्याही वयोगटातली आणि कोणत्याही आर्थिक स्तरातील महिला असो. तिच्या पर्समध्ये पैसे असो किंवा नसो, पण शॉपिंग करणं हे बहुतांश महिलांना खूप आवडतं. आपापल्या ऐपतीनुसार लहान- मोठी खरेदी केली, तरी अनेक जणी खूश होतात. इथपर्यंत तर सगळं ठिक आहे.. पण या एका तरुणीने मात्र कमालच केली. एवढी शॉपिंग करत बसली की बिलाची पट्टी तिच्या उंचीएवढी कधी झाली, हेच तिला कळालं नाही.(Women walks out from a mall with a bill as tall as her)
या एका भन्नाट शॉपिंगची न्यारीच गोष्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. समीरा असं शॉपिंग करणाऱ्या तरुणीचं नाव असून गोव्यामध्ये तिचा स्वत:च्या मालकीचा कॅफे आहे.
लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी
तर त्याचं झालं असं की समीराला एक लॅम्प विकत घ्यायचा होता. त्यासाठी ती हैद्राबाद (Hydrabad) येथील आयकिया (IKEA) माॅलमध्ये गेली. आता मॉलमध्ये गेल्यावर कुणीही महिला तिला जे घ्यायचं आहे, थेट तिथे जात नाही. तिथपर्यंत जाता जाता ती अनेक वस्तू बघत बघत जाते. समीराचंही तसंच झाली. मॉलमधल्या एकेक वस्तू बघताना ती त्यात रमत गेली आणि आवडत्या वस्तू घेत गेली...
Went to IKEA to buy ONE lamp.
— Sameera (@sameeracan) August 10, 2023
Forgot to buy the lamp. pic.twitter.com/drnz1hi7wb
या नादात ती जो लॅम्प घ्यायला आली होती, तो घ्यायलाच पुर्णपणे विसरून आली. त्याऐवजी अनेक वस्तू घेऊन बिलिंग काऊंटरला आली. तिथे बिल झाल्यावर बघते तर काय, ती बिलाची पट्टी चक्क तिच्या उंचीएवढी झाली होती.
२५ वर्षांच्या तरुणाची कमाल, पाहा त्याने बनवलेला जगातला सर्वात लहान आणि सुबक लाकडी चमचा..
ते पाहून तिलाच मोठी गंमत वाटली आणि तिने स्वत:चा तसा फोटो काढून तो लगेच सोशल मिडियावर शेअर केला. यानंतर ती आणि तिचं बिल या दोन्ही गोष्टी चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. तिचे ते बिल पाहून तिने काय- काय घेतलं असावं, याची खुमासदार चर्चा तिला आलेल्या कमेंट बॉक्समध्ये रंगते आहे...