Lokmat Sakhi >Social Viral > ट्रॅक्टरवर डान्स करताना अचानक बायकांचं कॅमेराकडे लक्ष गेलं; अन् ...पाहा व्हिडिओ

ट्रॅक्टरवर डान्स करताना अचानक बायकांचं कॅमेराकडे लक्ष गेलं; अन् ...पाहा व्हिडिओ

Women Were Dancing on The Tractor : व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर जात आहे आणि साडी नेसलेल्या काही महिला मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:28 PM2022-09-20T13:28:21+5:302022-09-20T14:00:57+5:30

Women Were Dancing on The Tractor : व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर जात आहे आणि साडी नेसलेल्या काही महिला मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

Women were dancing on the tractor suddenly they looked at the camera then this happened watch funny viral video | ट्रॅक्टरवर डान्स करताना अचानक बायकांचं कॅमेराकडे लक्ष गेलं; अन् ...पाहा व्हिडिओ

ट्रॅक्टरवर डान्स करताना अचानक बायकांचं कॅमेराकडे लक्ष गेलं; अन् ...पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर दररोज अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महिलांच्या डान्सचा आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, काही महिला गाणे म्हणत ट्रॅक्टरवरून जात आहेत, परंतु त्यांची नजर कॅमेऱ्यावर पडताच, जे घडले ते पाहून तुम्हालाही मजा येईल. (Women were dancing on the tractor suddenly they looked at the camera then this happened watch funny viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक ट्रॅक्टर जात आहे आणि साडी नेसलेल्या काही महिला मस्तीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. कंबर हलवत महिला मोठ्या मजेने नाचत आहेत. पण, अचानक महिलांची नजर मागे व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर पडते. तिचा व्हिडीओ बनवला जात आहे हे पाहताच ती लाजते आणि लपून बसते. बाकीच्या स्त्रिया हसतात आणि व्हिडिओ बनवणाऱ्या माणसाकडे वळून पाहतात.

 जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ; तज्ज्ञांचा दावा

हा व्हिडिओ ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 28 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - दीदी लाजली. दुसर्‍या युजरने कमेंट केली - मस्त डान्स.

Web Title: Women were dancing on the tractor suddenly they looked at the camera then this happened watch funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.