Join us  

मुंबईच्या नरिमन पॉईंटवर महिलांनी केला भन्नाट डान्स, पोलीस आयुक्तांनी शेअर केला व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 1:25 PM

Social Viral: नरिमन पॉईंट येथे गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या महिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे.. मुंबईकर महिलांचा हा डान्स स्वॅग एकदा बघायलाच हवा...(women's dancing group at Nariman Point, Mumbai)

ठळक मुद्देहा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाचा व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत 87.4K व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रत्येक शहराची वेगवेगळी खासियत असली तरी मुंबईची बातच न्यारी... असं अगदी सहज आपण बोलून जातो आणि बऱ्याच अंशी ते खरंही आहे. मुंबईसारखी किंवा मुंबईएवढी (Mumbai) हॅपनिंग नगरी महाराष्ट्रात (Maharashtra) दुसरी नाही, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. तिथे रोजच काहीतरी नविन काही तरी वेगळं होत असतं. आता हेच बघा ना, सध्या सोशल मिडियावर धुम करणारा हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) मुंबईचाच आहे. गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या मुंबईकर महिलांचा डान्स स्वॅग नेटकरींना भारीच आवडला आहे. (Dnce swag in Mumbai at Nariman Point)

 

मुंबईचे पोलिस कमिशनर संजय पांडे यांनी हा मुंबईकर महिलांच्या नृत्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटला शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाचा व्हायरल झाला असून त्याला आतापर्यंत 87.4K व्ह्यूज मिळाले आहेत. रविवार सकाळची मस्त थंड हवा, पावसाने ओलसर झालेले रस्ते आणि अशा थंड, कुंद वातावरणात मोठ्या उत्साहात झुंबा करणाऱ्या मुंबईकर महिला असा काहीसा तो व्हिडिओ आहे. यामध्ये जवळपास शंभर एक महिला दिसत असून प्रत्येक जणच अगदी एकाग्र होऊन 'Dancin' at di ghetto' या गाण्यावर झुंबा करत आहेत.

 

या महिलांचे झुंबा ट्रेनरही त्यांच्या सोबत असून त्यांच्याच मार्गदर्शनानुसार महिलांचे हे झुंबा डान्स वर्कआऊट सुरू आहे. नृत्य केल्यामुळे व्यायाम तर होतोच पण मनही प्रसन्न होऊन शरीरातील हॅप्पी हार्मोन्सचे सिक्रिशन वाढू लागते. त्यामुळे आवडत असेल तर व्यायामासाठी झुंबा वर्कआऊटचा पर्याय निवडायला काहीच हरकत नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलमुंबईट्विटरपोलिस