Join us  

काकूंनी ढोलकीवर असा धरला ठेका की व्हिडिओ पाहणारे म्हणाले, गुरुत्वाकर्षण गेलं कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 11:34 AM

Women’s Dance viral video : ढोलकीच्या तालावर त्या करत असलेला डान्स आणि त्याचा वेग पाहून खरंच आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

ठळक मुद्दे विशेष म्हणजे या महिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांना पाहणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि एकूण उत्साह कॅमेरात अतिशय नेमका टिपला गेला आहे.  ढोलकीच्या तालावर त्या करत असलेला डान्स आणि त्याचा वेग पाहून खरंच आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

डान्स म्हटलं की आपण पार हरखून जातो. मग ते बँजो किंवा ढोलाच्या तालावर असो नाहीतर अगदी मोठमोठ्या स्पीकरवर. गाणी ऐकली की आपल्या अंगात संचारतं आणि आपली पावलं मनसोक्त थिरकायला लागतात. डान्सचे खास प्रकार येत नसतील तर गणपती डान्स तर आपण सगळेच आवडीने करतो. महिला एरवी आपल्या कामात इतक्या गढलेल्या असतात की अशाप्रकारे एन्जॉय करायचा चान्स त्यांना कधीतरीच मिळतो. मग एकदा चान्स मिळाला की त्या ज्या काही हरखून जातात की विचारायलाच नको. यंदा जवळपास २ ते ३ वर्षाच्या अंतराने गणपती उत्सव अतिशय जोमाने सेलिब्रेट होत असताना सगळेच त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत (Women’s Dance viral video). 

(Image : Google)

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून यामध्ये काही महिला अतिशय उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. लाल रंगाची साडी नेसलेल्या या महिला साधासुधा डान्स करत नसून मागच्या बाजूला शरीराचा भार टाकून अतिशय उत्तम डान्स करताना दिसतात. यावेळी त्यांचे हातही हलत असल्याने हे सगळे एकावेळी करणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे त्यांच्यातील एनर्जी आणि साडीमध्ये अशाप्रकारचा डान्स करण्याची कला यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हा डान्स या महिला रस्त्यावरील कोणत्या तरी एका लहान गल्लीत करत असल्याचे दिसते. ढोलकीच्या तालावर त्या करत असलेला डान्स आणि त्याचा वेग पाहून खरंच आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

नेटीझन्सने या व्हिडिओवर बरेच कमेंटस केले असून ग्रॅव्हीटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण कुठे गेले असे अनेकींनी विचारले आहे. Videonational.teb या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ आपलोड करण्यात आला असून अवघ्या एका दिवसांत तो हजारो जणांनी पाहिला आहे. काहींनी हा कोणत्या प्रकारचा डान्स आहे असे विचारले आहे तर काहींनी या डान्सला झिरो ग्रॅव्हीटी डान्स असे म्हटले आहे. विशेष म्हणजे या महिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांना पाहणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि एकूण उत्साह कॅमेरात अतिशय नेमका टिपला गेला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य