जर्मनीमधील समाजवादी विचारवंत क्लारा झेटकिन यांनी १९१० मध्ये आंतरराष्ट्रीयमहिला दिन साजरा करण्याबाबत प्रस्ताव मांडला. (Women's Day 2025 : IWD's Symbolic Colors Purple, White And Green)त्याच्या पुढच्या वर्षी १९११ साली महिला दिन साजरा करण्याची संकल्पना सर्व मान्य झाली. १९१७ पासून ८ मार्च या दिवशी महिला दिन साजरा करण्याची सुरवात झाली. नंतर १९७५ साली जगभरातील विविध देशांनीसुद्धा हा दिवस साजरा करायला सुरवात केली. नंतर तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा करायला सुरवात झाली. (Women's Day 2025 : IWD's Symbolic Colors Purple, White And Green)
१९व्या शतकात महिलांच्या हक्कांसाठी रशियातील महिलांनी एकत्र येऊन आंदोलने केली होती . जगभरातून त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कष्टांची दखलही या दिवशी घेतली जाते. महिलांविरुद्ध होणारे अन्याय बंद व्हावेत, त्यांना कमी लेखणे बंद व्हावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जाऊ लागला. महिलांच्या सामाजिक योगदानाची दखल घेण्यासाठी विविध देशांमध्ये विविध पद्धतीने तो साजरा केला जातो. काही देशांमध्ये महिला दिन हा पब्लिक हॉलिडे म्हणूनही घोषित केला गेला.
महिला दिन साजरा करण्याचे ठरले तेव्हाच आणखी एक गोष्ट ठरवण्यात आली. तीन रंग निवडले गेले. जांभळा, पांढरा आणि हिरवा हे रंग महिला दिनाचे महत्त्व दर्शवणारे म्हणून मान्य करण्यात आले. 'आयडब्ल्यूडी'च्या पेजवर सांगितल्यानुसार, हे तीन रंग फक्त रंग नाहीत तर ते प्रतिक आहेत.
जांभळा
जांभळा रंग हा न्याय, प्रतिष्ठा तसेच समानतेचे प्रतिक आहे. महिलांना न्याय मिळावा असे हा रंग सांगतो. तसेच महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान समाजात मिळाले पाहिजे, असे आव्हान करणारा हा रंग आहे.
हिरवा
हिरवा रंग हा महिलांमध्ये असलेली सकारात्मकता दर्शवतो. हिरवा रंग हा आशेचे प्रतिक आहे. महिलांना बळ देण्यासाठी, प्रोत्साहान देण्यासाठी आशावादी राहणे गरजेचे आहे. न्याय नक्कीच महिलांच्या पारड्यात असेल, याची खात्री देणारा हा रंग आहे.
पांढरा
पांढऱ्या रंगाची संकल्पना अनेक देशांमधून वादाचा विषय ठरली. पांढरा रंग हा पावित्र्याचे प्रतिक आहे. पावित्र्याची संकल्पना मांडताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा ठरू शकतो. त्यामुळे हा विषय जरा वादाचा ठरला असला तरी, तो पावित्र्य, शुद्धता दर्शवणारा आहे.