Lokmat Sakhi >Social Viral > चांदीचे पैंजण - दागिने काळपट पडले? एक भन्नाट ट्रिक, हात न लावता, न घासता, १५ मिनटात चकाचक

चांदीचे पैंजण - दागिने काळपट पडले? एक भन्नाट ट्रिक, हात न लावता, न घासता, १५ मिनटात चकाचक

Wonderful and Easy Tricks to Clean Silver at Home चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक, नव्या चांदीसारखे चमकतील दागिने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 03:21 PM2023-03-12T15:21:23+5:302023-03-12T15:22:52+5:30

Wonderful and Easy Tricks to Clean Silver at Home चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक, नव्या चांदीसारखे चमकतील दागिने..

Wonderful and Easy Tricks to Clean Silver at Home | चांदीचे पैंजण - दागिने काळपट पडले? एक भन्नाट ट्रिक, हात न लावता, न घासता, १५ मिनटात चकाचक

चांदीचे पैंजण - दागिने काळपट पडले? एक भन्नाट ट्रिक, हात न लावता, न घासता, १५ मिनटात चकाचक

बाजारात सध्या सोन्यापेक्षा चांदीच्या दागिन्यांसाठी मागणी वाढत चालली आहे. चांदीच्या दागिन्यांना महिलावर्गाकडून पसंती मिळत आहे. कमी पैशात पण चांदीच्या आकर्षक डिझाइन्समध्ये महिला सुरेख दिसतात. पैंजण, कानातले, बाजूबंद, हार, जोडवी अशा विविध प्रकारचे दागिने बाजारात मिळतात. महिलांच्या कोमल पायांवर चांदीचे पैजण खूप सुंदर दिसतात. छम - छम करत जाणाऱ्या पायांवर सर्वांच्याच नजरा पडतात. पण पैंजण लवकर काळपट पडतात. ही चमक पुन्हा आणण्यासाठी आपण दागिन्यांना ज्वेलरी शॉपमध्ये देतो. अथवा घरीच मेहनत घेऊन घासत बसतो.

या चांदीच्या दागिन्यांमध्ये चमक आणण्यासाठी काय करावे? चांदी कमी वेळात कसे चमकतील? अशा अनेक प्रकारचे प्रश्न मनात येतात. दरम्यान, आपण एक जबरदस्त ट्रिक फॉलो करून, चांदीच्या दागिन्यांना हात न लावता, न घासता झटपट कमी वेळात चमकवू शकतो(Wonderful and Easy Tricks to Clean Silver at Home).

चांदी चमकवण्याच्या ट्रिकसाठी लागणारं साहित्य

अॅल्युमिनियम फॉइल

मीठ

बेकिंग सोडा

डिटर्जंट पावडर

पाणी

सर्वप्रथम, अॅल्युमिनियम फॉइल घ्या. त्याचे चार चौकोनी भाग करून घ्या. दुसरीकडे एका भांड्यात दीड ग्लास पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात अॅल्युमिनियम फॉइलच्या चार तुकड्यांचे गोळे तयार करा. हे गोळे गरम पाण्यात घाला. चमच्या मदतीने त्या गोळ्यांना पाण्यात बुडवून ठेवा.

ट्रान्सजेंडर कपलच्या घरी हालला पाळणा, बारशाला घेतला मोठा निर्णय; बाळाचं नावही चर्चेत…

आता त्यात चांदीचे दागिने टाकून गॅस हाय फ्लेमवर ठेवा, पाण्याला चांगली उकळी आणा. थोड्या वेळानंतर तुम्हाला दिसून येईल की, अॅल्युमिनियम फॉइल काळपट पडत जाईल. ५ मिनिटानंतर त्यात अर्धा चमचा मीठ. एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिटर्जंट पावडर टाका. आता मिडीयम गॅसवर पाणी उकळवत ठेवा. १० मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करा.

फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट

पाणी थंड झाल्यानंतर चांदीचे दागिने बाहेर काढून स्वच्छ पाण्यात ठेवा, आणि धुवून घ्या. अशा प्रकारे काळपट पडलेले चांदीचे दागिने न घासता, न अधिक मेहनत घेता स्वच्छ चमकतील. जर आपल्या चांदीच्या दागिन्यांमध्ये नक्षी काम असेल, तर ब्रशच्या मदतीने चांदी घासा. 

Web Title: Wonderful and Easy Tricks to Clean Silver at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.