Lokmat Sakhi >Social Viral > सिलेंडर कधी संपणार आठवत नाही? १ घरगुती युक्ती, सेकंदात कळेल सिलेंडर संपत आलंय की..

सिलेंडर कधी संपणार आठवत नाही? १ घरगुती युक्ती, सेकंदात कळेल सिलेंडर संपत आलंय की..

Wondering How Much Gas Is Left In Your LPG Cylinder? Try This Easy Hack : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे कसं कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 10:00 AM2024-08-01T10:00:42+5:302024-08-01T10:05:01+5:30

Wondering How Much Gas Is Left In Your LPG Cylinder? Try This Easy Hack : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे कसं कळणार?

Wondering How Much Gas Is Left In Your LPG Cylinder? Try This Easy Hack | सिलेंडर कधी संपणार आठवत नाही? १ घरगुती युक्ती, सेकंदात कळेल सिलेंडर संपत आलंय की..

सिलेंडर कधी संपणार आठवत नाही? १ घरगुती युक्ती, सेकंदात कळेल सिलेंडर संपत आलंय की..

घरोघरी गॅस सिलेंडर असते. याचा वापर स्वयंपाक करण्यासाठी होतो (Cylinder Gas). यावर जेवण करणे सोयीस्कर होते. परंतु, लाल रंगाच्या लोखंडी सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे कळून येत नाही. अनेकदा जेवण बनवताना सिलेंडरमधील गॅस संपून जाते. अशावेळी घरी दुसरा गॅस सिलेंडर उपलब्ध नसेल तर, तारांबळ उडते (Kitchen Hacks).

पण या लाल रंगाच्या लोखंडी सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे ओळखता येऊ शकते का? गॅस शिल्लक आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपण ओल्या टॉवेलचा वापर करू शकता. ओल्या टॉवेलच्या मदतीने आपण सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे ओळखू शकता. ओल्या टॉवेलचा वापर नेमका कसा करावा? पाहा(Wondering How Much Gas Is Left In Your LPG Cylinder? Try This Easy Hack).

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक हे ओल्या टॉवेलने कसे चेक कराल?

सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी आपण ओल्या कापडाची मदत घेऊ शकता.

पावसाळ्यात कपाटातल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय- कपड्यांचा घाणेरडा वास विसरा

- सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक हे ओळखण्यासाठी सर्वात आधी, कापड ओले करून सिलिंडरभोवती गुंडाळा. कापड गुंडाळल्यानंतर, काही मिनिटे सोडा.

- काही मिनिटानंतर सिलेंडरमधून ओले कापड काढाल तेव्हा, सिलेंडरचा काही भाग कोरडा तर काही भाग ओला दिसेल.

- सिलेंडरचा जो भाग कोरडा आहे तो रिकामा आहे, तर जो भाग ओला आहे, तेवढा गॅस सिलिंडरमध्ये शिल्लक आहे. कारण सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही. पण त्याउलट ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.

Web Title: Wondering How Much Gas Is Left In Your LPG Cylinder? Try This Easy Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.