थंडी वाढली (Winter Tips) की माळ्यावर ठेवून दिलेले लोकरीचे कपडे (Woolen Clothes) काढतो. आणि धुवून घालतो. डीचे दिवस वगळता वर्षभराचे ७ ते ८ महिने हे कपडे एखाद्या बॅगमध्ये ठेवून दिलेले असतात. त्यामुळे आता हे कपडे आता पुन्हा जेव्हा आपण वापरात आणतो, त्यापुर्वी ते एकदा धुवून घेतलेले कधीही चांगले (Cleaning Tips). पण धुवून घेतल्यानंतर कपड्यांवर तशीच चमक राहत नाही. शिवाय कपड्यांमध्ये सैलसरपणा येतो. ज्यामुळे फिटिंगही खराब होते.
लोकरीचे कपडे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे धुताना अधिक काळजी घ्यावी लागते. जर ते व्यवस्थित धुतले गेले नाहीत तर ते त्यांचा आकार आणि रंग फिका पडतो. लोकरीचे कपडे धुताना नक्की कोणते टिप्स फॉलो कराव्या?(Woollen clothes: Care Tips and Mistakes to Avoid).
लोकरीचे कपडे धुताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या?
कोमट पाण्याने धुणे
कपडे धुताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करू नये. लोकरीचे फॅब्रिक अतिशय नाजूक असते. ज्यामुळे फिटिंग खराब होते. अशा स्थितीत कोमट पाणी वापरू नये. त्यामुळे लोकरीचे कपडे नेहमी थंड पाण्याने धुवावे.
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
सामान्य डिटर्जंट वापरणे टाळा
लोकरीचे कपडे धुण्यासाठी सामान्य डिटर्जंट वापरणे टाळा. लोकरीचे कपडे धुण्यासाठी खास डिझाइन केलेले ‘वूल वॉश’ डिटर्जंट वापरावे. सामान्य डिटर्जंटमध्ये विविध रसायने असतात. ज्यामुळे लोकरीचे कपडे खराब होतात.
कपड्यांना घासणे
लोकरीचे कपडे धुताना, त्यांना जोरात घासण्याची किंवा कडक उन्हात वाळवण्याची चूक करू नका. यामुळे कपड्यांचा आकार बिघडतो. लोकरीचे कपडे हलक्या हातांनी धुवावेत. यामुळे कपडे लवकर खराब होणार नाही.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
ड्रायरमध्ये कपडे वाळवणे टाळा
ड्रायरमध्ये लोकरीचे कपडे सुकवण्याची चूक कधीही करू नका. ड्रायरची गरम हवा लोकरीच्या कपड्यांसाठी खूप हानिकारक आहे, कारण त्यामुळे फॅब्रिक आकुंचन पावू शकते. लोकरीचे कपडे बाल्कनीमध्ये वाळत घाला. थेट सूर्यप्रकाशात वाळवणे टाळा.