सोशल मीडिया हे सध्या आपल्या सगळयांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहे. हल्ली शब्दांबरोबरच भावना व्यक्त करण्यासाठी आपण इमोजीचा मोठ्या प्रमाणात वापर करतो (World Emoji Day 2022). आनंद, दु:ख, प्रेम, राग यांसारख्या अनेक गोष्टी आपण या इमोजीच्या माध्यमातून व्यक्त करतो. जगभरात लोक एकमेकांशी संवाद साधताना व्हॉटसअॅप, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, इ-मेल यांसारखी संवादाची माध्यमे वापरताना या इमोजींचा वापर करतात (Most Use Emoji of 2021 ). कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अर्थपूर्ण संवादाचे माध्यम म्हणून ओळखले जाणारे हे इमोजी तरुण वर्गाची भाषा असल्याचे बोलले जाते (Laugh-Cry Emoji).
अत्यानंदाने डोळ्यातून पाणी येणारी इमोजी फारशी आकर्षक नसली तरी जगभरात ही इमोजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात जगात ऑनलाइन माध्यमे वापरणाऱ्या लोकांमधील जवळपास ९२ टक्के लोकांनी हसता हसता रडण्याची ही इमोजी वापरली. प्रत्यक्षात प्रचंड हसू आल्यावर ही इमोजी वापरली जात असली तरी आनंदाश्रू असा त्या इमोजीचा खरा अर्थ आहे हे आपल्यातील अनेकांना माहित नसते. नुसते हसायचे असेल तर आपण स्माइलच्या वेगवेगळ्या इमोजी वापरतो, पण एखाद्या गोष्टीवर किंवा जोकवर आपल्याला जोरदार हसू आले तर आपण आवर्जून ही इमोजी वापरतो. यातही नुसती जोरात हसणारी आणि तिरकी होऊन जोरजोरात हसणारी असे दोन पर्याय आपण वापरु शकतो.
साधारणपणे २०१९ पासून विविध प्रकारच्या इमोजी वापरण्याचा पॅटर्न फारसा बदलला नसला तरी भरपूर हसण्याच्या इमोजीबरोबरच प्रेमाचे प्रतिक असलेला बदामही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अँड्रॉईड आणि अॅपल या दोन्ही प्रकारच्या डिव्हाईसवरुन या इमोजी वापरल्या जातात. दर काही दिवसांनी इमोजीमध्ये भर पडत असून जगण्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी नवनवीन प्रकारच्या इमोजी तयार करण्यात येतात. त्यामुळे आतापर्यंत विविध माध्यमांतून वापरल्या जाणाऱ्या इमोजीची संख्या ३,६६३ इतकी झाली आहे. आता जगात सर्वात जास्त वापरली जाणारी इमोजी जोरदार हसण्याची असली तरी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणती इमोजी सर्वात जास्त वापरता?