सॅण्डविच हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्त्यामध्ये जसं सॅण्डविच चालतं, तसंच ते संध्याकाळच्या चहासोबतही जमून जातं. शाळा- कॉलेज- ऑफिस संपवून सायंकाळी घरी आल्यानंतर भूक लागलेलीच असते. अशावेळी मनपसंत सॅण्डविच मिळालं की लहान- मोठे सगळेच खुश होऊन जातात. आता आपण घरी करतो त्या सॅण्डविचच्या तुलनेत अतिभव्य- अतिविशाल सॅण्डविच एकाने तयार केलं. या सॅण्डविचचं वजन तब्बल १८९ किलो असून त्याची जगातलं सगळ्यात मोठं गिल्ड चिज सॅण्डविच म्हणून गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंद घेण्यात आली आहे. (World Largest Grilled Cheese Sandwich from Guinness book of world record)
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार एक्सोडस आणि इग्गी हे अमेरिकेतले युट्यूबर्स आहेत. त्यांच्या चॅनलने काही दिवसांपुर्वीच १०० हजार सबस्क्रायबरचा आकडा ओलांडला. या आनंदानिमित्त त्यांनी हा सॅण्डविचचा रेकॉर्ड करण्याचा निश्चय केला आणि त्यांना त्यात यशही आलं.
तळपायाला खूप भेगा पडल्या? हा घ्या आजीबाईंच्या बटव्यातला खास उपाय, इतर कोणत्याही क्रिमची गरजच नाही
आता जगातल्या हा रेकॉर्ड पुर्ण करण्यासाठी त्यांना त्यांचे मित्रमंडळी, नातलग, आई- वडील, शेजारी यांच्याकडून भरपूर मदत झाली. त्यांनी केलें हे सॅण्डविच तब्बल ६. २ फूट उंच असून १०. ८ फूट लांब आहे. तर त्याची जाडी ७ सेमी एवढी अहे.
गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील परिक्षकांच्या मते या सॅण्डविचमधलं चीज पुर्णपणे वितळलं जाणं आणि सॅण्डविचच्या ब्रेडचे दोन्ही टोकं चांगले भाजले जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि ते त्या दोघांनी यशस्वीपणे पेलून नवा विक्रम केला आहे.