काही स्त्रियांना आपल्या कपड्यांना परफेक्ट मॅच होणारी नेलपेंट (Expensive Nail Polish) लावण्याची हौस असते. इतकेच नाहीतर तर काहीजणींकडे नेलपेंट्सच्या इतक्या शेड्स असतात की त्या प्रत्येक आऊटफिटला मॅचिंग अशी नेलपेंट लावणे पसंत करतात. स्टायलिश दिसण्यासाठी अनेकजणी नखांना नेलपेंट लावतात. सध्या वेगवेगळ्या नेलआर्टचाही ट्रेंड आहे. तरुणी पैसे खर्च करुन पार्लरमध्ये आवडीचं नेलआर्ट करून घेतात. विशेषत: तरुणींना आपल्या हातापायांची निगा राखायला आवडतं. हातापायांना छान नेलपॉलिश लावून हात - पाय टापटीप ठेवणे हा अनेक तरुणींचा पसंतीचा विषय असतो(A 267-Carat Black Diamond Nail Polish Costs Rs 1,63,66,000 & It's Making Our Heads Spin).
नेलपेंट लावल्याने आपली नखं अधिक सुंदर व आकर्षक दिसतात. तरुणींमध्ये सध्या वेगवेगळ्या नेलपेंट्सच्या शेडसची, नेल आर्टची क्रेझ पहायला मिळते. आपली नखं सुंदर दिसण्यासाठी तरुणी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करताना दिसतात. ते म्हणतात ना..." शौक बडी चीज है", हौसेला मोल नसतं हेच खरं आहे. आत्तापर्यंत आपण कपडे, चपला, घड्याळे, फर्निचर, दागिने यांसारख्या महागड्या, ब्रँडेड वस्तू पाहिल्या असतील. पण एका नेलपेंटची किंमत ही ३ मर्सिडीज कारच्या किंमतीपेक्षा जास्त असू शकते असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का ? जर आपणसुद्धा नेलपेंटचे शौकीन असाल आणि तुम्हालाही नखांना नेलपॉलिश लावायला आवडत असेल, तर या महागड्या नेलपेंटबद्दल तुम्हाला माहित असणे महत्त्वाचे आहे(World's most expensive nail polish costs more than 3 Mercedes; know its price, what makes it special).
नेलपेंट.... तीही इतकी महागडी कशी काय ?
होय ! ही आहे जगातील सर्वात महागडी नेलपेंट. या महागड्या नेलपेंटचे नाव अॅझेचर (Azature) आहे. ही नेलपेंट लॉस एंजेलिस येथील डिझायनर अॅझेचर पोगोसियन यांनी तयार केली आहे. डिझायनर अॅझेचर हा त्याच्या लक्झरी वस्तूंसाठी जगभरात लोकप्रिय आहे. सर्वात आधी ही नेलपॉलिश दुरून पाहिल्यावर आपल्याला बघताना साधी वाटेल परंतु यात २६७ कॅरेटचा ब्लॅक डायमंड लपलेला आहे. ज्याची किंमत १,६३,६६,००० रुपये आहे.
मोठ्ठा काळा फुटबॉल बनून रॅम्पवर आली मॉडेल, चालता चालता हरवली इतकी बिथरली की...
हाॅलिवूड अभिनेत्रींनाही भूरळ...
या काळ्या रंगाच्या नेलपॉलिशच्या एका बाटलीची किंमत सुमारे २,५०,००० डाॅलर्स म्हणजेच १ कोटी ९० लाख रुपये आहे. या काळ्या रंगाच्या नेलपॉलिशच्या खरेदीदारांमध्ये हॉलिवूड अभिनेत्री मेगन फॉक्स, केली क्लार्कसन आणि लिव्ह टायलर यांची नावे आहेत. याआधीही या ब्रँडने लाखो रुपये किमतीचे नेलपॉलिश आणि हिरे बाजारात आणले होते. पण ब्लॅक डायमंड नेल पॉलिश हे सर्वांधिक लोकप्रिय ठरले आहे.
ही नेलपेंट इतकी महाग कशी काय ?
अॅझेचर ब्लॅक डायमंड इतका महाग असण्याचे मुख्य कारण म्हणजे ते बनवण्यासाठी वापरलेले साहित्य. हा डायमंड बनवण्यासाठी जे साहित्य वापरले त्यामुळे तो इतका महाग किमतीला विकला जातो. त्यामुळेच या नेलपॉलिशची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. हे नेलपॉलिश ऑर्डर केल्यानंतर ते महागड्या मॅनिक्युअर सेवेसोबतच तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. याच कारणामुळे ते फक्त काही सेलिब्रिटी मॅनिक्युरिस्टच्या मदतीनेच वापरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत केवळ २५ जणांनी हे इतके महागडे नेलपेंट विकत घेतले आहे.