Join us  

२५ वर्षांच्या तरुणाची कमाल, पाहा त्याने बनवलेला जगातला सर्वात लहान आणि सुबक लाकडी चमचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 11:32 AM

World's Smallest Wooden Spoon: जगातला आकाराने सगळ्यात लहान लाकडी चमचा बनविण्याचा विक्रम शशिकांत प्रजापती (Shashikant Prajapati) या भारतीय तरुणाच्या नावावर नुकताच नोंदविला गेला आहे. 

ठळक मुद्देशशिकांतने तयार केलेला चमचा ०.०६ म्हणजेच १.६ मीमी एवढा लहान आहे.

लाकडी चमचा बनवणे हे सोपे आहे. पण जगातला सगळ्यात छोटा लाकडी चमचा तयार करणे, ही खरोखरच माझ्यासाठी खूप कठीण गोष्ट होती, असं म्हणत शशिकांत प्रजापती या तरुणाने त्याच्या या कलाकृतीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. शशिकांत प्रजापती हा २५ वर्षीय तरुण मुळचा बिहारचा (Bihar) असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness book of world record) त्याची नुकतीच झालेली नोंद हा भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. (World's smallest wooden spoon is prepared by Shashikant Prajapati)

 

याआधी सगळ्यात लहान लाकडी चमचा म्हणून ज्याची नोंद झाली होती, तो चमचा आकाराने २ मीमी म्हणजेच ०.०७ इंचाचा होता. नवरतन प्रजापती या भारतीय व्यक्तीनेच तो तयार केला होता.

रोज फक्त १० मिनिटं करा २ व्यायाम, पोटावरची चरबी झरझर होईल कमी- मिळेल फिटनेससह उत्तम फिगर

आता शशिकांतने हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. शशिकांतने तयार केलेला चमचा ०.०६ म्हणजेच १.६ मीमी एवढा लहान आहे. याविषयी सांगताना शशिकांत म्हणाले की हा चमचा बनविण्यासाठी त्यांना आधी खूप सराव करावा लागला. तब्बल १० वेळा त्यांनी चमचा बनविला पण अगदी शेवटच्या क्षणी तो तुटायचा. पेनाच्या टोकावरही मोठा दिसेल, एवढा त्या चमच्याचा आकार लहान आहे. 

मायक्रो आर्ट करणे हा शशिकांत यांचा छंदच आहे. २०१५ पासून ते पेन्सिलीच्या टोकावर विविध कलाकृती तयार करतात. एकेका कलाकृतीसारठी १०- १० तास सलग बसावे लागते असे ते म्हणाले.

लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

पेन्सिलीच्या सगळ्यात छोट्या टोकावर कलकृती तयार करणे यासाठी २०१६ मध्येही त्यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डबिहार