Join us  

अंगणात लावा ३ रोपं- डास-चिलटं होणार नाहीत, सापही घरात येणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 6:53 PM

Worried of Snakes ? Top 4 Powerful Plants that Repel Snakes Away : घराजवळ लावा 'ही' झाडं; सापांची भीती नाही.

पावसाळ्यात अनेक प्रकारचे किडे आणि सरपटणारे प्राणी फिरतात (Snakes). घराच्या आजूबाजूला गार्डन, जंगलं, तलाव, नाले, डोंगर किंवा भरपूर झाडंझुडुपं जरी असतील, तरी या ठिकाणी हे प्राणी फिरून कधी घराजवळ येतील सांगता येत नाही (Plants). मुख्य म्हणजे अशा ठिकाणी साप देखील असतात. जे रस्ता चुकत कधी आपल्या घराजवळ पोहचतील सांगता येत नाही. पावसाळ्यात गावाकडच्या किंवा ज्यांचं घर झाडंझुडुपाच्या जवळ आहे, अशा परिसरात साप हमखास दिसतात.

विविध प्रजातीचे साप पावसाळ्यात रस्त्यावर फिरतात. सापांची प्रत्येकाला भीती असते. त्यामुळे घराजवळ साप भटकूही नये असे अनेकांना वाटते. कारण विषारी सापामुळे आपल्या जीवाला धोका असतो. सापांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर, घराजवळ ४ प्रकारची झाडं लावा. साप दूर राहतील(Worried of Snakes ? Top 4 Powerful Plants that Repel Snakes Away).

कडूलिंबाचे झाड

कडूलिंब हे चवीला कडू असते. या झाडाचा गंध सापांनाही आवडत नाही. ज्यामुळे साप या झाडापासून दूर राहणे पसंत करतात. जर घराभोवती साप फिरू नये असे वाटत असेल तर, दार किंवा अंगणात कडूलिंबाचे झाड लावा. यामुळे साप दूर राहतील. किंवा कडुलिंबाचे तेल किंवा त्याचा रस स्प्रे बाटलीत पाण्यात मिसळून फवारल्यासही फायदा होईल. यामुळे डास आणि चिलटंही दूर राहतील.

२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..

झेंडूच्या फुलांचे रोप

बरेच लोक त्यांच्या बागेत, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये पिवळ्या झेंडूच्या फुलांचे रोप लावतात. जर तुमच्याही घरात किंवा घराबाहेर झेंडूच्या फुलांचे रोप असेल तर, तुम्ही सापांपासून सुरक्षित राहाल. झेंडूचे फूल दिसायला खूप सुंदर असते. पण याच्या उग्र गंधामुळे साप झाडाच्या भोवतीने भटकत नाही. यामुळे साप घरांपासून दूर राहतात.

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

कॅक्टस

कॅक्टस हे एक काटेरी झाड आहे. सापांना अशा झाडाजवळ भटकायला आवडत नाही. त्यामुळे हे झाड आपण राच्या खिडक्या, मुख्य गेट, बाल्कनी अशा ठिकाणी लावू शकता. 

टॅग्स :मोसमी पाऊससापसोशल व्हायरल