Join us  

सापांची भीती वाटते, घराजवळ साप निघतात? घरात लावा ४ रोपं; साप- किडे फिरकणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 3:50 PM

Worried of Snakes ? Top 4 Powerful Plants that Repel Snakes Away : अंगणात लावा ४ रोपं, साप - डास आणि चिलटं राहतील दूर

पावसाळ्यात अनेक प्रकारचे किडे आणि सरपटणारे प्राणी फिरतात (Snakes). घराच्या बाजूला गार्डन, जंगलं, तलाव, नाले, डोंगर किंवा भरपूर झाडंझुडुपं जरी असतील, तरी या ठिकाणी हे प्राणी फिरून कधी घराजवळ येतील सांगता येत नाही (Plants). या दिवसात आजारांसोबतच धोकादायक सापही घरात शिरतात. जे रस्ता चुकत घरात शिरतात.

साप गावाकडच्या किंवा शहरी घरात शिरल्याने आपल्याला त्रास होतो. विषारी सापाचा धोका आपल्याला जास्त असतो. घर जर नदी किंवा तलावाजवळ असेल तर, हा धोका आणखीन वाढतो. जर घरात सरपटणारे प्राणी आणि साप शिरू नये असं वाटत असेल तर, अंगणात किंवा घरात ४ प्रकारची झाडं लावा(Worried of Snakes ? Top 4 Powerful Plants that Repel Snakes Away).

सर्पगंधा झाड

सर्पगंधा या झाडाचे गंध सापांना आवडत नाही. या झाडाचा गंध इतका तीव्र असतो की, साप झाडापासून दूर पळतात. या झाडाचे पान हिरवे, पिवळा आणि तपकिरी असते. पावसाळ्यात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण बाल्कनीमध्ये सर्पगंधा हे झाड ठेऊ शकता.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

वर्मवुड झाड

वर्मवुड झाडामुळे साप घराजवळ येत नाही. याच्या कडू आणि उग्र वासामुळे साप झाडाजवळ येत नाही. आपण हे झाड अंगणात, बाल्कनी किंवा मुख्य गेटवरही रोप ठेऊ शकता. आपल्याला हे झाड नर्सरीमध्ये मिळू शकते. आणि हे झाड लावणे तसं फार सोपं आहे. त्याची निगा राखणं अवघड नाही.

झेंडूच्या फुलांचे रोप

बरेच लोक आपल्या बागेत झेंडूच्या फुलांचे रोप लावतात. झेंडूचे फूल दिसायला खूप सुंदर असते. पण याच्या उग्र गंधामुळे साप झाडाच्या भोवतीने भटकत नाही. यामुळे साप घरांपासून दूर राहतात. या झाडामुळे आपल्याला सुंदर फुलं मिळतील. शिवाय घराभोवती सापही फिरकणार नाही.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

कडूलिंबाचे झाड

कडूलिंब हे चवीला कडू असते. या झाडाचा गंध सापांनाही आवडत नाही. ज्यामुळे साप या झाडापासून दूर राहणे पसंत करतात. जर घराभोवती साप फिरू नये असे वाटत असेल तर, दार किंवा अंगणात कडूलिंबाचे झाड लावा. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाबागकाम टिप्स