Join us  

आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 3:23 PM

Wrestler Antim Panghal: कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने तिच्या 'अंतिम' या नावामागची खास गोष्ट नुकतीच सांगितली आहे...

ठळक मुद्देकाही जण तिच्या नावाचा ॲण्टीम असाही उल्लेख करतात. म्हणूनच ती ती सांगतेय तिच्या आगळ्यावेगळ्या नावाची एक खास गोष्ट...

कुस्तीपटू अंतिम पंघाल हे नाव ऐकलं की बऱ्याच जणांना ते खटकतं. कारण हे नाव खूप वेगळं आहे. आपल्याकडे अशी नाव सहसा ऐकायला मिळत नाहीत. अंतिम म्हणजे शेवट, समाप्ती. असा नकारात्मक अर्थ असल्याने तिचं नाव असं का असावं, असा प्रश्न बऱ्याचदा पडतोच. काही जण तिच्या नावाचा ॲण्टीम असाही उल्लेख करतात. ते ऐकून तिला हसू येतं.. म्हणूनच ती ती सांगतेय तिच्या आगळ्यावेगळ्या नावाची एक खास गोष्ट... (Wrestler Antim Panghal says why her parents named her antim)

 

अंतिम पंघाल ही मुळची हरियाणातल्या भगाना या छोट्याशा गावात जन्मलेली. तिला सरिता, मिनू, निशा अशा ३ मोठ्या बहिणी. तिची आई चौथ्यांदा गरोदर राहिली आणि तिने पुन्हा एकदा मुलीला जन्म दिला. परत एकदा मुलगीच झाली हे पाहून वडिलांनी आता बस्स... यानंतर मुलगी नको.

पोटदुखीपासून ते कोलेस्ट्रॉल, मधुमेहापर्यंत कित्येक दुखण्यांना पळवून लावणाऱ्या १० जादुई बिया! खाऊन पाहा 

ही आमची अंतिम मुलगी असावी, असं म्हणत तिला 'अंतिम' नाव दिलं आणि गंमत म्हणजे तिचं तेच नाव प्रचलित झालं. जियो सिनेमाच्या 'द ड्रीमर्स' ला दिलेल्या मुलाखतीत तिने हा रंजक किस्सा सांगितला. तिची मोठी बहिण सरीता ही कबड्डीची राष्ट्रीय खेळाडू. तिच्याकडे बघूनही अंतिमही खेळात आली आणि तिने कुस्ती खेळ निवडला. 

 

आता लवकरच पॅरिसमध्ये हाेणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये १९ वर्षांच्या ५३ किलो वजनी गटात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तिची जिवापाड मेहनत सुरू आहे.

सोनम कपूरच्या आवडीचा चटपटीत मसाला मखाना, मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी मस्त रेसिपी- करून बघा

ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने तिचे खणखणीत नाणे वाजवून दाखवले असून विजयश्री खेचून आणली आहे. त्यामुळेच तर ऑलिम्पिकमधूनही तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत. नाव अंतिम असले तरी तिचा कोणताच विजय कधीच अंतिम नसावा, असं वाटतं.. 

 

टॅग्स :पॅरिस ऑलिम्पिक २०२४कुस्तीमहिलाप्रेरणादायक गोष्टी