Girl Name : आपल्या मुलीचं नाव सगळ्यात वेगळं असावं आणि त्याचा अर्थही चांगला असावा अशी प्रत्येक आई-वडिलांची ईच्छा असते. मात्र, चांगलं नाव शोधणं हे काही सोपं काम नाही. नाव शोधता शोधता आणि निवडताना अनेकदा कन्फ्यूजनही होतं. अशात आम्ही तुमच्यासाठी २०२४ सालात सगळ्यात लोकप्रिय मुलींचं नावं कोणती ठरली याची एक लिस्ट आणली आहे. यापैकी एखाद्या नावाची निवड तुम्ही तुमच्या मुलीसाठी करू शकता.
आराध्या
आराध्या हे नाव अलिकडच्या काही वर्षात फारच लोकप्रिय झालं. संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ "पूजा करण्या योग्य" किंवा "आशीर्वाद" असा आहे. हे नाव पारंपरिकही आहे आणि आधुनिकही आहे. ऐश्वर्या राय बच्चनच्या मुलीचं नावही आराध्या आहे.
जारा
जारा हे एक छोटं आणि सुंदर नाव आहे. मुळात अरबी असलेल्या या नावाचा अर्थ "राजकुमारी" किंवा "फूल" असा होतो. मुस्लिमांमध्ये हे नाव चांगलंच पसंत केलं जातं.
सानवी
सानवी हे एक संस्कृत नाव आहे. याचा अर्थ "ज्ञान" किंवा "देवी लक्ष्मी" असा होतो. तुम्ही जर स अक्षरावरून नाव शोधत असाल हे नावही चांगला पर्याय आहे.
माया
माया या नावाचे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. संस्कृतमध्ये याचा अर्थ "भ्रम" किंवा "जादू", तर हिब्रूमध्ये याचा अर्थ "पाणी" आहे.
आरिया
आरिया हे एक छोटं, सुंदर आणि वेगळं नाव आहे. इटलीमध्ये याचा अर्थ "हवा" किंवा "गीत" होतो. २०२४ मध्ये अनेकांनी या नावाची निवड आपल्या मुलीच्या नावासाठी केली.
विहा
विहा हे एक संस्कृत नाव आहे. याचा अर्थ "स्वर्ग" किंवा "आकाश" होतो. हेही नाव छोटं, सुंदर आणि वेगळं आहे.
निया
निया नावाचे सुद्धा वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ "उद्देश्य", तर गेलिकमध्ये याचा अर्थ "उज्ज्वल" होतो.