आत्ताची तरुण पिढी फार मानसिक ताणातून जाताना आपल्याला दिसते. तसं बघितलं तर या पिढीला जेवढ्या सोयीसुविधा मिळाल्या त्यापेक्षा आधीच्या पिढ्यांना फार कमी सुविधा मिळाल्या आहेत. ( young girls should avoid these 5 mistakes)तरी ही पिढी एवढ्या मानसिक तणावातून का जाते? असा प्रश्न आपल्याला पडतो. तरुण मुलामुलींच्या आत्महत्येचं प्रमाणही वाढलं आहे. खास करून मुली अशा परिस्थितीला सामोऱ्या जाताना आपल्याला दिसतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, सर्वच क्षेत्रात वाढलेली स्पर्धा. ( young girls should avoid these 5 mistakes)मुली घराबरोबरच स्वत:चं अस्तित्वही उभारत आहेत. दोन गोष्टी एकत्र करताना मानसिक ताण येणं साहाजिक आहे. अजूनही विविध कारणे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झाली आहेत. तरूण मुलींनी या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा.
१. तरुण मुलामुलींना पूर्ण सातंत्र्य हवं असतं. पण पालक त्यांच्या मुलींना बऱ्याच गोष्टींसाठी विरोध करतात. मग हळूहळू पालक आणि मुली मध्ये फुट पडायला लागते. पालकांनी मुलींना स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. पण समाजासाठी कलंक असलेले अनेक नराधम आहेत. त्यामुळे पालकांची बाजूही मुलींनी समजून घ्या. पालकांना स्वत:ची बाजू सांगताना त्यांची बाजूही ऐका. ( young girls should avoid these 5 mistakes)
२. मित्रमैत्रिणींच्या नादाने वाहवत जाऊ नका. चुकीची संगत निवडू नका. सुसंगतीतच राहा. तुमच्या ज्ञानात चांगली भर पाडणारे, आयुष्यात काही बनण्यासाठी प्रयत्न करणारे सोबती निवडा. आपल्यावर आपल्या संगतीचा प्रचंड परिणाम होतो. त्यामुळे मैत्री चांगला परिणाम करणारीच असावी.
३. आजकालच्या मुलींमध्ये ओवरथिंकींगचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे मग पुढे जाऊन एन्झायटी ॲटॅक वगैरे यायला सुरवात होते. त्यामुळे वेळीच सावरा. कितीही कामात गुंतलेले असलात तरी, स्वत:साठी वेळ काढा. मन रमवण्यासाठी आवडीच्या कृती करा.
४. आरोग्याकडे लक्ष द्या. झिरो फीगरच्या नादात मुली कमकुवत होत आहेत. आकर्षक शरीरासाठी कष्ट घेणे चांगलेच आहे. पण आरोग्य जास्त महत्त्वाचे. बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आतून कमकुवत होण्यात काहीच अर्थ नाही.
५. काही ना काही कामामध्ये गुंता. आताच्या काळात मुली व्यवसायाच्या क्षेत्रातही नाव कमवत आहेत. छंद असतील तर ते जोपासा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नाही तर ,आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा.