Join us  

रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 1:44 PM

Google search: गुगलने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये तरूण मुलींना इंटरनेटवर (internet) काय सर्च करायला  आवडतं हे सांगितलं आहे... 

ठळक मुद्देगुगलने जो डाटा बेस यासाठी वापरला आहे, त्यापैकी ७५ टक्के महिला १५ ते ३४ या वयोगटातील आहेत.

इंटरनेट म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या हातात आलेलं एक खेळणं.. मोठी माणसं असो की लहान मुलं.. प्रत्येक जण आपापल्या चॉईसनुसार इंटरनेटवर वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असतो... त्यामुळेच कुणाचीही मोबाईल हिस्ट्री चेक केली तर लगेचच त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्याला स्पष्टपणे कळून येतात.. कारण मोबाईल सर्चवरून कोणाचा इंटरेस्ट कशात आहे, हे लगेचच लक्षात येतं.. गुगलने नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला असून यामध्ये तरूण मुलींना रात्री एकट्या असताना इंटरनेटवर कोणत्या गोष्टी सर्च करायला आवडतात हे सांगितलं आहे. गुगलने जो डाटा बेस यासाठी वापरला आहे, त्यापैकी ७५ टक्के महिला १५ ते ३४ या वयोगटातील आहेत.

 

मुलींना या ४ गोष्टी इंटरनेटवर बघायला आवडतात...१. ब्यूटी टिप्स..(beauty tips)ब्यूटी हा अनेक जणींचा वीक पाॅईंट.. म्हणूनच तर बहुतांश तरूण मुली रात्री इंटरनेटवर ब्यूटी टिप्स विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात. १७ ते ३४ या वयोगटातील बहुतांश मुलींना इंटरनेटवर वेगवेगळे कॉस्मेटिक्स, मेकअप टिप्स, घरगुती सौंदर्योपचार, लेटेस्ट ब्यूटी ट्रेण्ड्स, जगभरातील फॅशन ट्रेण्ड याविषयी माहिती घेण्याची आवड असते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

 

२. करिअर आणि वेगवेगळे अभ्यासक्रम.. (carrier)आपल्याला करिअरच्या अतिशय मोजक्याच संधी माहिती असतात. आपल्या ओळखीचे लोक ज्या क्षेत्रात करिअर करतात, तेवढेच आपण जाणतो. पण त्या पलिकडेही करिअरच्या प्रचंड संधी आहेत, हे अनेक जणी जाणतात. म्हणूनच आपल्या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या संधी शोधण्याचा प्रयत्न अनेक तरूणी इंटरनेटच्या माध्यमातून करतात.

 

३. ऑनलाईन शॉपिंग.. (online shopping)शॉपिंग हा अनेक जणींचा आवडीचा छंद.. आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करायची नसली तरी उगीच वेगवेगळ्या, नवनविन गोष्टी बघणे हा तर बहुतांश महिलांचा स्वभाव. हाच स्वभाव इंटरनेटवरही दिसून आला आहे. अनेक तरूण मुली रात्रीच्या वेळी शॉपिंग साईट्सला भेट देतात. तिथल्या वेगवेगळ्या ऑफर, नविन कलेक्शन, लेटेस्ट ट्रेण्ड्स या सगळ्या गोष्टी त्या इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. 

 

४. गाणी ऐकतात.... (light romantic music)दिवसभर प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताे. त्यामुळे खूप इच्छा असूनही दिवसा गाणी ऐकायला मिळत नाही. त्यामुळे अनेक जणी रात्रीच्या वेळी इंटरनेटवर गाणी सर्च करतात. लाईट म्युझिक ऐकत झोपण्याची सवयही अनेक जणींना असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हलकी फुलकी, रोमँटिक गाणी जास्त शोधली जातात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलगुगलमहिलामोबाइलइंटरनेट