Lokmat Sakhi >Social Viral > मोठ्या भावानं पहिल्या पगारातून आणलेलं गिफ्ट पाहताच चिमुरड्याला कोसळलं रडू; पाहा Video

मोठ्या भावानं पहिल्या पगारातून आणलेलं गिफ्ट पाहताच चिमुरड्याला कोसळलं रडू; पाहा Video

Younger brother gets emotional seeing the gift from elder brother :

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:41 AM2022-12-21T10:41:27+5:302022-12-21T10:51:09+5:30

Younger brother gets emotional seeing the gift from elder brother :

Younger brother gets emotional after seeing the gift from elder brother | मोठ्या भावानं पहिल्या पगारातून आणलेलं गिफ्ट पाहताच चिमुरड्याला कोसळलं रडू; पाहा Video

मोठ्या भावानं पहिल्या पगारातून आणलेलं गिफ्ट पाहताच चिमुरड्याला कोसळलं रडू; पाहा Video

भाऊ बहिणीचं नात जगातील सुंदर नात्यापैकी एक आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात ते पाहिल्यानंतर बहिण भावाच्या प्रेमाची जाणीव होते आणि मन भावूक होतं. असाच  एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video)  या व्हिडिओमध्ये मोठा भाऊ आपल्या पहिल्या नोकरीच्या पगारातून लहान भावासाठी गिफ्ट घेतो. हे गिफ्ट पाहून लहान भावाला अश्रू अनावर होतात. व्हिडिओमधील लहान भावाची रिएक्शन पाहून सोशल मीडिया युजर्ससुद्धा भावूक झाले आहेत. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. (Younger brother gets emotional after seeing the gift from elder brother)

आयुष्यात काही क्षण असे असतात जे शब्दात मांडता येत नाहीत.  मोठ्या भावाची भेट पाहून लहान भाऊ काहीही न बोलता आनंद व्यक्त करत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,  पहिल्या पगारातून मोठा भाऊ त्याच्या लहान भावासाठी त्याच्या आवडीची एक सुंदर भेट घेतो. या दरम्यान, लहान भाऊ बेडवर आरामात झोपलेला असतो, तेव्हाच मोठा भाऊ त्याच्या लहान भावाला उठवतो आणि त्याच्या पहिल्या कमाईतून खरेदी केलेली भेटवस्तू त्याच्यासमोर ठेवतो, ज्यामुळे मुलाच्या आनंद गगनात मावेनासा  होतो. 

केस पांढरे झालेत? तेल बदलूनही उपयोग झाला नाही; काळ्याभोर, केसांसाठी शहनाज हुसैनचा उपाय

मोठ्या भावाने भेट म्हणून दिलेले त्याचे आवडते शूज पाहून लहान भाऊ भावूक होतो. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. शूज पाहून लहान भाऊ मोठ्या भावाला प्रेमाने मिठी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर गुडन्यूज मूव्हमेंट नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 2.6 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स त्यावर लव्ह इमोजीचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Younger brother gets emotional after seeing the gift from elder brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.