महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे फक्त अभ्यास,परिक्षा इतकंच नव्हे. महाविद्यालयत अनेकदा उत्साहानं केलेले उपक्रम मुलांच्या करिअरची दिशा ठरवतात तर काहीवेळा टर्निंग पॉईंट ठरतात. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये एसआयईएस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयानं लोकमत सखी प्रायोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सव "जूनून" सिझन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा धमाका केला.
2 मार्च रोजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आयोजित केलेला हा एक दिवसीय शो होता.संपूर्ण टीमच्या उत्कटतेमुळे कार्यक्रम ऑफलाइन आयोजित केले गेले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला आणि सर्व कार्यक्रम यशस्वीपणे हाताळले. “जुनून” ही SIESONS-2022 ची थीम होती. 14 फेब्रुवारीला कॉलेज कॅम्पसमध्ये सीझन्स- च्या संपूर्ण टीमने काही भव्य परफॉर्मन्ससह ही थीम रिलीज केली होती.
प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. दिवसाची सुरुवात फॅशन शो, रॅप बॅटल , बीटबॉक्सिंग, डान्स इव्हेंट्स, ब्लॉगिंग यांसारख्या अनेक कार्यक्रमांनी झाली ज्यांचे त्या क्षेत्रातील विविध सेलिब्रिटी, तज्ज्ञांकडून परिक्षण केले जात होते.
सद्यस्थिती पाहता संपूर्ण टीमने फेस्टची संध्याकाळ अविस्मरणीय ठरावी म्हणूनच सर्वोत्कृष्ट कलाकारांना आमंत्रित केले. संध्याकाळचा दुसरा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून एक अत्यंत प्रतिभावानगायक गजेंद्र वर्मा होता, ज्याने आपल्या सुमधुर आवाजाने वातावरण सुरेल केले. स्वयंसेवकांनी सिझन्सचा जयघोष करत एका सुंदर दिवसाची सांगता केली.